Ladki Bahin Yojana disqualified List News In Marathi : महाराष्ट्र सरकारने राज्यातील गरीब परिवारातील महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी लाडकी लाडकी बहीण योजना सुरू केली या योजनेच्या माध्यमातून महिलांना दर महिन्याला 1500 रुपये देण्या सरकारने सुरू केले आणि जुलै ते नोव्हेंबर पर्यंतचे पैसे कोटी वधी पात्र महिलांच्या खात्यात सरकारने जमा केले.
या योजनेच्या माध्यमातून महायुती सरकारला विधानसभा निवडणुकीमध्ये मोठे यश प्राप्त झाले आणि पाच डिसेंबर 2024 रोजी राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुती सरकार राज्य स्थापन झाले आणि लवकरच या योजनेचा सहावा हप्ता सरकारकडून महिलांच्या खात्यात जमा केले जाणार आहे.
परंतु अशामध्येच लाखो महिला या योजनेमधून वगळल्या गेल्या असल्या संदर्भात माहिती समोरीत आहे तर आज आपण या संदर्भात सविस्तर माहिती पुढे पाहणार आहोत.
Table of Contents
Ladki Bahin Yojana disqualified List Overview
योजनेचे नाव | मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना |
योजनेची घोषणा | राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून |
योजनेची सुरुवात | 28 जून 2024 |
लाभार्थी | महाराष्ट्र राज्यातील अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या महिला |
आर्थिक मदत | 1500 रुपये महिना |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 15 ऑक्टोबर 2024 |
Ladki bahin Yojana Registration Link | https://ladakibahin.maharashtra.gov.in/ |
हेल्पलाइन नंबर | 181 |
लाडकी बहीण योजनेसंदर्भात थोडक्यात माहिती
महायुती सरकारची सर्वात महत्त्वपूर्ण योजना ज्या योजनेचे नाव आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेला राज्यभरातून मोठ्या प्रमाणात महिलांचा प्रतिसाद मिळाला आहे आणि याच योजनेच्या मदतीने महायुती सरकारला मोठा फायदा झालेला आहे या योजनेला लागू करण्यामागचे सरकारचे उद्देश की राज्यातील महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे व त्यांना आर्थिक स्वातंत्र देणे तसेच या योजनेचा लाभ घेऊन महिला आपल्या परिवाराचा योग्य प्रकारे सांभाळ करू शकतील या उद्देशाने सरकारने हि योजना लागू केली आहे.
आतापर्यंत सरकारने या योजनेअंतर्गत पाच हप्त्याचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात 7500 हजार रुपये जमा केलेले आहेत आणि लवकरच या योजनेअंतर्गत सहावा हप्ता महिलांच्या खात्यात जमा केला जाणार आहे.
लाडक्या बहिणीच्या मंजूर अर्जाची पडताळणी होणार
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठीच्या महिलांनी ऑनलाईन अर्ज सादर केले होते व त्यांचे अर्ज मंजूर करून त्यांना या योजनेअंतर्गत लाभ देण्यात आलेला आहे परंतु सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे की या योजनेच्या मंजूर अर्जाची पुन्हा पडताळणी केली जाणार आहे तरी या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात स्पष्टीकरण दिले असता ज्या महिलांचे अर्ज मंजूर आहे अशा सर्व महिलांना या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार .
त्यामुळे सध्या तरी सरकारकडून मंजूर अर्जाची पुन्हा पडताळणी करण्यासंदर्भात कुठलाच निर्णय घेण्यात आलेला नाही त्यामुळे महिलांनी अशा होणाऱ्या चर्चा वर विश्वास ठेवू नये असेही आव्हान अदिती तटकरे यांनी केलेली आहे.
अरे बापरे लाखो महिला अपात्र
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलेले आहे की ज्या महिलांचे अर्ज मंजूर आहे अशा सर्व महिलांना या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार परंतु शासनाच्या अधिकृत पोर्टलवर अपात्र महिलांची यादी जाहीर केलेली आहे त्यामध्ये ज्या महिलांना निराधार योजनेअंतर्गत लाभ मिळत आहे अशा महिलांना सरकारने या योजनेमधून वगळण्याचा निर्णय घेतलेला आहे.
कारण सरकारने या योजनेच्या पात्रतेच्या नियमांमध्ये स्पष्ट सांगितले होते की ज्या महिलांना इतर शासकीय योजनेअंतर्गत 1500 रुपये मिळत असतील तर या योजनेअंतर्गत अशा महिलांना लाभ दिला जाणार नाही परंतु अनेक महिलांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज सादर केले आणि त्यांचा अर्ज मंजूर पण करण्यात आला व त्यांना या योजनेअंतर्गत पाच हप्त्याचे पैसे मिळाले.
परंतु महाराष्ट्र सरकारकडून निराधार योजनेच्या सर्व पात्र महिलांना या योजनेअंतर्गत अपात्र घोषित करण्यात आलेले आहे अशी माहिती समोर येत आहे.
Ladki Bahin Yojana Disqualified List
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा जर लाभ तुम्हाला पण मिळत आहे आणि तुम्हाला ( Ladki Bahin Yojana Disqualified List ) अपात्र यादीमध्ये तुमचे नाव चेक करायचे आहे त्यासाठी तुम्हाला खाली काही स्टेप दिलेले आहेत त्याला फॉलो करून तुम्ही तुमचे नाव यादीत पाहू शकता .
- सर्वात पहिले तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर ( https://ladakibahin.maharashtra.gov.in ) जेवावे लागेल
- त्यानंतर तुम्हाला लॉगिन या ऑप्शन वर क्लिक करावे लागेल
- तुमच्यासमोर लॉगिन पेज ओपन होईल त्यामध्ये तुम्ही तयार केलेली लॉगिन आयडी पासवर्ड टाकून इंटर करून घ्यावे
- आता तुमच्यासमोर लाभार्थी महिलांची यादी दिसेल
- त्यामध्ये तुमच्या नावासमोर SanjayGandhi असे ऑप्शन दिसेल तर त्यावर जर ग्रीन टिक लागलेली असेल
- तर अशा महिला निराधार योजनेच्या लाभार्थी आहेत आणि त्यांना या योजनेअंतर्गत अपात्र घोषित करण्यात आलेले आहे
तर अशा सोप्या पद्धतीने तुम्ही अपात्र यादीत तुमचे नाव तपासू शकता त्याचप्रमाणे जर तुम्ही सेतू केंद्रा किंवा अंगणवाडी केंद्रांमध्ये अर्ज सादर केलेला असेल तर तुम्हाला त्या केंद्रामध्ये भेट देऊन यासंदर्भात माहिती प्राप्त करावी लागेल.
हे पण वाचा : पात्र महिलांच्या अर्जाची पडताळणी होणार ? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली महत्वाची माहिती
नमस्कार मी चंद्रकांत घोडके मागील दहा वर्षापासून सरकारी योजना संदर्भात ब्लॉगिंग व यूट्यूब च्या माध्यमातून माहिती देत आहे, त्यामुळे आपल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना च्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला जे काही माहिती दिली जात आहे ती अभ्यासपूर्वक दिली जात आहे .