Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला नवा कार्यक्रम, आता सर्व महिलांना मिळणार लाभ, पहा सविस्तर माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ladki Bahin Yojana Families Visiting Program : महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी व त्यांना आर्थिक स्वतंत्र देण्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार महिलांना 1500 रुपये दर महिन्याला देत आहे या योजने अंतर्गत दोन टप्प्याचे वितरण सरकारने केले आहे परंतु अशा अनेक महिला आहेत त्यांचे अर्ज जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये अर्ज मंजूर झालेले आहेत परंतु त्यांना त्या योजनेचा पैसा मिळाला नाही अशा महिला योजनेचे लाभाच्या प्रतीक्षेत आहेत.

याच दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी ( Ladki Bahin Yojana Families Visiting Program ) कुटुंब भेट कार्यक्रमाची घोषणा केली आहे त्यानुसार लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना आता मुख्यमंत्री भेट देणार आहेत या कार्यक्रमाला सुरुवात पण झाली आहे. तर आज आपण मुख्यमंत्री यांनी केलेल्या कार्यक्रमा संदर्भात संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

काय म्हणले मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सांगण्यात आले की या कार्यक्रमांतर्गत दररोज 15 कुटुंबाची एक शिवसैनिक भेट घेणार आहे आणि त्याचप्रमाणे मुख्यमंत्री म्हणून मी स्वतः पण 15 कुटुंबांना भेट देणार आहे माझी लाडकी बहीण योजनेचा ज्या कुटुंबाला लाभ झाला आहे आणि ज्या कुटुंबाला या योजनेचा लाभ झालेला नाही अशा दोन्ही पण कुटुंबाला भेट देण्यात येणार आहे.

Ladki Bahin Yojana QNA : लाडकी बहीण योजनेचा अर्ज मंजूर पण पैसे कधी येणार ? सप्टेंबरमध्ये अर्ज भरल्यावर किती पैसे मिळणार? तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरे

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, लेक लाडकी योजना, मुख्यमंत्री वयश्री योजना, कामगार कल्याण योजना, महिला बचत गट या सर्व योजना लोकांपर्यंत पोहोचल्या का ? व त्यांना या योजनेचा लाभ मिळत आहे का ? आणि त्याचप्रमाणे ज्यांना लाभ मिळाले नाही त्यांना लाभ कसा मिळवता येईल यावर आम्ही लक्ष देणार आहोत अशी माहिती मुख्यमंत्री आणि दिली.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana Families Visiting Program

महाराष्ट्र सरकारने मुलीला जन्म झाल्यापासून ते शिक्षणापर्यंत व त्याचप्रमाणे शेतकरी बांधव असो की राज्यातील महिला या सर्वांसाठी शासनाने इकोसिस्टम तयार केलेले आहेत याआधी सरकारकडून विविध योजनांची घोषणा करण्यात यायची परंतु या योजनेचा लाभ लाभार्थ्यांना मिळत नसायचा

लाभार्थी शासकीय कार्यालयाचे चकरा मारून थकून जायचे मात्र नंतर शासन आपल्या दारी यासारखे कार्यक्रम सुरू करण्यात आले आणि लाभार्थ्यांना तात्काळ मदत व शासनाच्या योजनेच्या लाभ देण्यात आला. अशाच प्रकारे शासनाच्या प्रत्येक योजना लाभ व माहिती लाभार्थ्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे आणि लाभार्थ्यांना त्यांचा लाभ झाला पाहिजे यासाठी कुठून भेट कार्यक्रम ( Ladki Bahin Yojana Families Visiting Program ) सुरू करण्यात आलेला आहे असे मुख्यमंत्री यांनी सांगितले.

Leave a Comment