Ladki Bahin Yojana Ineligible List News In Marathi : महाराष्ट्र सरकारने विधानसभा निवडणुकीच्या अगोदर राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केली या योजनेच्या अंतर्गत राज्यातील 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिलांना सरकारकडून 1500 देण्यास सुरुवात झाली या योजनेचा लाभ घेऊन महिला आपल्या परिवाराचा सांभाळ करू शकतील व त्यांना आर्थिक अडचणीचा फटका बसू नये या उद्देशाने ही योजना सरकारने लागू केली.
या योजनेअंतर्गत जुलै ते डिसेंबर पर्यंतचे सर्व पैसे 2 कोटी 47 लाख महिलांच्या खात्यात सरकारने जमा केले आणि लवकरच या योजनेअंतर्गत 2100 रुपये महिना दिला जाणार आहे अशातच सरकारकडून या योजनेबाबत मोठे पाऊल उचलताना दिसत आहे सरकार या योजनेतून लाखो महिलांना वगळण्याच्या तयारीत आहे तर आज आपण सरकार कोणकोणत्या महिलांना योजनेतून वगळणार आहे व त्यामध्ये तुमचे नाव आहे का या संदर्भात सविस्तर माहिती आपण पुढे पाहणार आहोत.
Table of Contents
या तारखेपासून महिलांना मिळणार 2100 रुपये
महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राज्यातील महिलांना आश्वासन दिले होते की आमचे सरकार राज्यात पुन्हा स्थापन झाल्यास लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1500 रुपये ऐवजी 2100 रुपये महिना देऊ अशातच महायुती सरकारला मोठ्या प्रमाणात यश प्राप्त झाले आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्व सरकार स्थापन झाले.
राज्याचे मंत्रिमंडळ स्थापन झाले व लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला परंतु सरकारने आश्वासन दिले होते की या योजनेअंतर्गत 2100 रुपये महिलांना देणार परंतु सरकारने डिसेंबर महिन्यात महिलांच्या खात्यात फक्त 1500 रुपये जमा केले त्यामुळे महिलांना प्रश्न पडला आहे की सरकारने जे आश्वासन दिले होते ते आश्वासन पूर्ण कधी होणार.
यासंदर्भात आमच्या टीमने माहिती मिळवली असता महाराष्ट्र सरकारकडून पुढील होणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये या योजनेच्या वाढीव हप्त्याची तरतूद केली जाणार आहे आणि त्यानंतर महिलांना या योजनेअंतर्गत 2100 महिना दिला जाईल त्यामुळे महिलांना मार्च 2025 नंतर या योजनेअंतर्गत 2100 महिना दिला जाईल अशी बातमी समोर येत आहे.
हे पण वाचा : 2100 रुपये ह्या दिवशी जमा होणार, तारीख ठरली नवीन वर्षात सरकार देणार मोठी भेट
या महिलांना सरकार योजनेतून वगळणार
मीडिया रिपोर्टच्या माहितीनुसार मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी 2 कोटी 67 लाख पेक्षा अधिक आहे त्यामधील सरकारने 2 कोटी 47 लाख महिलांना लाभ दिलेला आहे परंतु सरकारकडून आता लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची फेर पडताळणी केली जात आहे त्यामध्ये ज्या महिला या योजनेच्या निकषांमध्ये बसणार नाहीत अशा महिलांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे त्याची ( Ladki Bahin Yojana Ineligible List ) माहिती खालील प्रमाणे.
- लाभार्थी महिलांचा विवाह इतर राज्यामध्ये झालेला असेल तर अशा महिलांना या योजनेतून वगळले जाणार
- शासकीय नोकरी मिळाली असेल तर अशा महिलांना या योजनेतून वगळले जाणार
- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत लाभ मिळत असेल तर अशा महिलांना पण या योजनेतून वगळले जाणार
- महिलांच्या कुटुंबातील सदस्यांची नावे चार चाकी वाहन असल्यास अशा महिलांना पण या योजनेतून वगळले जाणार
- कुटुंबातील दोन पेक्षा अधिक महिलांनी या योजनेचा लाभ घेतला असेल तर अशा महिलांना पण हे योजनेतून वगळले जाणार
- निराधार योजनेच्या लाभ घेणाऱ्या महिलांना पण योजनेतून वगळले जाणार.
Ladki Bahin Yojana Online Apply 2025
नमस्कार मी चंद्रकांत घोडके मागील दहा वर्षापासून सरकारी योजना संदर्भात ब्लॉगिंग व यूट्यूब च्या माध्यमातून माहिती देत आहे, त्यामुळे आपल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना च्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला जे काही माहिती दिली जात आहे ती अभ्यासपूर्वक दिली जात आहे .
1 thought on “Ladki Bahin Yojana Ineligible List : या यादीतील महिलांना सरकार वगळणार, लगेच चेक करा तुमचे नाव”