Ladki Bahin Yojana New From : राज्य सरकार राज्यातील महिलांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना च्या माध्यमातून आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी दर महिन्याला १ ५ ० ० आर्थिक मदत करत आहे आतापर्यंत राज्य सरकारकडे दोन कोटी पेक्षा अधिक ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले त्यामधील दोन कोटीच्या जवळपास ऑनलाईन अर्ज मंजूर पण करण्यात आलेले आहेत.त्याचप्रमाणे लाखो महिलांच्या खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्याची मिळून तीन हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहे.
परंतु या योजने संदर्भात एक मोठी माहिती समोर येत आहे महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यामधून एका व्यक्तीने आपल्या पत्नीच्या नावी तब्बल या योजनेसाठी 30 ऑनलाईन अर्ज दाखल केले होते आणि त्यामधील 26 अर्ज मंजूर झालेले आहे आणि त्या मंजूर झालेल्या अर्जाचे पैसे त्या महिलांच्या खात्यामध्ये जमा पण झालेले आहे या सर्व बाबीवर लक्ष देत सरकारने या योजनेसंदर्भात मोठा निर्णय घेतलेला आहे आणि या योजनेची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया बंद केली आहे.
जर तुम्ही आतापर्यंत या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज सादर केलेला नाही आणि तुम्हाला प्रश्न पडलाय की आता ऑनलाइन अर्ज कशा प्रकारे करायचा लाभ कशा प्रकारे घ्यायचा तर तुम्हाला मी ह्या आर्टिकल च्या माध्यमातून अर्ज कशा प्रकारे करायचा आणि सरकारचा शासन निर्णय काय सांगतो त्या संदर्भात संपूर्ण माहिती आपण पुढे पाहणार आहोत.
Table of Contents
लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- उत्पन्न दाखला किंवा केसरी किंवा पिवळ्या रंगाचे राशन कार्ड
- अधिवास प्रमाणपत्र ( अधिवास प्रमाणपत्र नसेल तर जन्म दाखला, शाळा सोडण्याचा दाखला, मतदान कार्ड ) यापैकी कोणतेही एक पंधरा वर्षे पूर्ण झालेले कागदपत्र सादर करावे लागले
- पासपोर्ट साईज फोटो
- हमीपत्र
- अर्ज फॉर्म
सरकारने वाढवली या योजनेची शेवटची तारीख
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख सरकारने 31 ऑगस्ट 2024 ठेवली होती आणि यादरम्यान दोन कोटी पेक्षा अधिक महिलांनी या योजनेसाठी ऑनलाईन सादर केले होते परंतु अशा अनेक महिलांनी या योजनेसाठी काही कारणास्तव ऑनलाईन अर्ज करू शकले नाही अशा सर्व महिला या योजनेपासून वंचित राहू नये म्हणून सरकारने या योजनेच्या अर्ज करण्याच्या शेवटची तारीख मध्ये वाढ करण्यात आली आहे आता सरकारने अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2024 ठेवली आहे.
नवीन शासन निर्णया संदर्भात थोडक्यात माहिती
महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध केलेले होते आणि त्या माध्यमातून राज्यातील महिला ऑनलाईन अर्ज सादर करत होत्या परंतु सरकारने यासंदर्भात एक नवीन शासन निर्णय काढलेला आहे सरकारकडून त्या शासन निर्णयामध्ये स्पष्ट सांगण्यात आले की लाडकी बहीण योजनेच्या अर्ज संख्या मर्यादित असल्याने फक्त अंगणवाडी केंद्रामार्फत अर्ज प्रक्रिया सुरू ठेवण्यात येईलअसा निर्णय शासनाने घेतलेला आहे.
त्यामुळे आता तुम्हाला तुमचा अर्ज स्वतः किंवा सेतू केंद्रामार्फत भरता येणार नाही तुम्हाला फक्त अंगणवाडी केंद्रामध्ये ऑफलाईन अर्ज सादर करावा लागेल.
Ladki Bahin Yojana New GR Pdf Download Link
File Name | Majhi Ladki Bahin Yojana New GR Pdf |
Size | 248kb |
Downlead Link | Click Here |
अशा प्रकारे करावे लागेल अर्ज सादर
महाराष्ट्र सरकारने या योजनेसाठी आता नवीन अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे तुम्हाला स्वतः किंवा सेतू केंद्रामध्ये ऑनलाईन अर्ज करता येणार नाही आता फक्त तुम्हाला अंगणवाडी केंद्रा मार्फत अर्ज सादर करायचा आहे त्यासाठी तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने एक अर्ज फॉर्म फील करावा लागेल त्यासोबत तुम्हाला या योजनेसाठी लागणारे सर्व आवश्यकता कागदपत्रे जोडून अंगणवाडी कर्मचारी यांच्याकडे तो अर्ज जमा करावा लागेल त्यांच्यामार्फत तुमचा अर्ज ऑनलाईन केला जाणार आणि तुम्हाला या योजनेचा लाभ दिला जाणार.
Ladki Bahin Yojana New From Pdf
File Name | Ladki Bahin Yojana New From Pdf |
Size | 248kb |
Downlead Link | Click Here |
Ladki Bahin Yojana Important Link
Ladki Bahin Yojana Approved List | Click Here |
Ladki Bahin Online Apply 2024 | Click Here |
Ladki Bahin Yojana Aadhar Link Process | Click Here |
re-Apply Ladki Bahin Yojana Reject Form | Click Here |
नमस्कार मी चंद्रकांत घोडके मागील दहा वर्षापासून सरकारी योजना संदर्भात ब्लॉगिंग व यूट्यूब च्या माध्यमातून माहिती देत आहे, त्यामुळे आपल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना च्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला जे काही माहिती दिली जात आहे ती अभ्यासपूर्वक दिली जात आहे .