Majhi Ladki Bahin Online Apply : महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी व त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागू नये या उद्देशाने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ( Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana ) सुरू करण्यात आलेली आहे या योजनेच्या माध्यमातून राज्यातील पात्र महिलांना सरकार दरमहा पंधराशे रुपये देत आहे, जुलै 2024 पासून या योजनेची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे.
राज्य सरकारने या योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 31 ऑगस्ट 2024 ठेवली होती परंतु राज्यातील कोणती महिला या योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये म्हणून सरकारने अर्ज करण्याची शेवटची तारीख वाढून 30 सप्टेंबर 2024 ठेवली आहे याबाबत पण सरकारने काही दिवसा अगोदर शासन निर्णय काढलेला आहे.
त्याचप्रमाणे सरकारने 6 सप्टेंबर 2024 रोजी या योजनेसंदर्भात एक नवीन जीआर काढलेला आहे त्यामध्ये सरकारने या योजनेच्या अर्ज प्रक्रियेमध्ये बदल केलेला आहे तर आज आपण शासनाच्या नवीन निर्णयानुसार या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कशा प्रकारे करायचा आहे आणि शासन निर्णय काय सांगतो याबाबत संपूर्ण माहिती आपण पुढे पाहूया.
Table of Contents
Majhi Ladki Bahin Online Apply Overview
योजनेचे नाव | मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना |
योजनेची अंमलबजावणी | 28 जून 2024 |
राज्य | महाराष्ट्र |
लाभार्थी | राज्यातील महिला |
आर्थिक मदत | 1500 रुपये प्रति महिना |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन/ऑफलाइन |
Ladki Bahin Yojana Official Website | Click Here |
हेल्पलाइन नंबर | 181 |
नवीन शासन निर्णय काय सांगतो
महाराष्ट्र सरकारने काढलेल्या 2 सप्टेंबर 2024 च्या शासन निर्णयानुसार या योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत वाढ देण्यात आलेली आहे ज्या महिला योजनेसाठी काही कारणास्तव अर्ज करू शकले नाहीत अशा महिला 30 सप्टेंबर 2024 पर्यंत या योजनेसाठी अर्ज सादर करू शकतात परंतु शासनाच्या 6 सप्टेंबर 2024 च्या शासन निर्णयामध्ये या योजनेच्या अर्ज प्रक्रियेमध्ये बदल केले आहेत.
सरकारने सुरुवातीला नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका/अंगणवाडी सेवीका, समूह संघटक-CRP (NULM, MSRLM व MAVIM) , मदत कक्ष प्रमुख, CMM (City Mission Manager), आशा सेवीका, सेतू सुविधा केंद्र, आंगणवाडी, ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र या 11 अधिकृत कार्यालय व शासकीय कर्मचारी यांच्यामार्फत अर्ज करण्याची परवानगी दिल्यात आलेली होती.
परंतु सदर योजनेअंतर्गत आता अर्ज करण्याची संख्या मर्यादित असल्याने फक्त अंगणवाडी केंद्रामार्फत अर्ज स्वीकारण्यास सरकारने मान्यता दिली आहे या संदर्भात शासन निर्णय सरकारने जाहीर करण्यात आला आहे.
Majhi Ladki Bahin Online Apply ( New Process )
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी जर तुम्ही सप्टेंबर महिन्यात अर्ज सादर करत आहात तर सरकारने या अर्ज प्रक्रियेमध्ये बदल केलेला आहे आता तुम्ही स्वतः व इतर कार्यामार्फत योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकणार नाही आहे आता तुम्हाला तुमच्या जवळच्या अंगणवाडी केंद्रामध्ये जाऊन ऑफलाईन फॉर्म भरून आणि आवश्यक सर्व कागदपत्रे जोडून जमा करायचा आहे त्यानंतर तुमच्या अर्जाची पडताळणी करून तुमचा अर्ज मंजूर केला जाणार व तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार.
Majhi Ladki Bahin Yojana New GR
File Name | Majhi Ladki Bahin Yojana New GR Pdf |
Size | 248kb |
Downlead Link | Click Here |
नमस्कार मी चंद्रकांत घोडके मागील दहा वर्षापासून सरकारी योजना संदर्भात ब्लॉगिंग व यूट्यूब च्या माध्यमातून माहिती देत आहे, त्यामुळे आपल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना च्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला जे काही माहिती दिली जात आहे ती अभ्यासपूर्वक दिली जात आहे .
1 thought on “Majhi Ladki Bahin Online Apply : अर्ज प्रक्रियेत मोठा बदल, आता सर्वांना अर्ज करता येणार नाही, लाडकी बहीण योजने संदर्भात नवीन शासन निर्णय”