Ladki Bahin Yojana New GR : महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना आर्थिक स्वतंत्र देण्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषण सुधारण्यासाठी व त्याचप्रमाणे कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे, या योजनेसाठी महाराष्ट्र सरकारकडे दोन कोटी पेक्षा अधिक ऑनलाइन अर्ज प्राप्त झाले आहेत.
आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून लाखो महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याची मिळून तीन हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा केले आहेत परंतु अशा अनेक महिला आहेत ज्यांनी काही कारणास्तव आत्तापर्यंत या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सादर केलेला नाही अशा सर्व महिलांसाठी सरकारने एक नवीन जीआर काढलेला आहे तरी या जीआर मधील संपूर्ण माहिती आपण पुढे पाहूया.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना
महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार राज्यातील महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये देणार आहे या योजनेचा लाभ घेऊन महिला आपल्या परिवाराचा सांभाळ करू शकतील व त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार नाही या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने ही योजना पूर्ण महाराष्ट्रभर लागू केली आहे.
राज्यातील महिलांना दिलासा
मुख्यमंत्री माजी लाडकी योजना संदर्भात महिला बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी राज्यातील महिलांना मोठा दिलासा दिलेला आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2024 ठेवण्यात आलेली होती त्यानुसार अनेक महिलांनी या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सादर केले होते व सरकारने पूर्ण क्षमतेने अर्ज पडताळणी करून लाखो महिलांचे अर्ज मंजूर करण्यात आली होते आणि अशा सर्व पात्र महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याची मिळून तीन हजार रुपये त्यांचे बँक खात्यामध्ये जमा केलेली आहे
परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे अनेक महिलांनी या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज भरले नाहीत तरी अशा सर्व महिलांना या योजनेचा लाभ घेता यावा म्हणून राज्य सरकारने या योजनेच्या अर्ज करण्याच्या कालावधीमध्ये वाढ करण्यात आलेली आहे आता महिलांना सप्टेंबर महिन्यातही या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहे.
Ladki Bahin Yojana New GR Link
File Name | Ladki Bahin Yojana New GR Pdf |
Size | 244kb |
Download Link | Click Here |
नमस्कार मी चंद्रकांत घोडके मागील दहा वर्षापासून सरकारी योजना संदर्भात ब्लॉगिंग व यूट्यूब च्या माध्यमातून माहिती देत आहे, त्यामुळे आपल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना च्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला जे काही माहिती दिली जात आहे ती अभ्यासपूर्वक दिली जात आहे .