Ladki Bahin Yojana New Rule News In Marathi : महाराष्ट्र राज्यातील लाडकी बहीण योजना या योजनेला सरकारने राज्यातील महिलांना आर्थिक मदत देण्यासाठी सुरू केलेली आहे या योजनेच्या माध्यमातून सरकार महिलांना 1500 पये दर महिन्याला देत आहे या योजनेअंतर्गत आतापर्यंत सरकारने पात्र महिलांना पाच हप्त्याचे पैसे 7500 हजार रुपये थेट त्यांच्या आधार लिंक बँक खात्यात जमा केले आहे.
याचा फायदा सरकारला विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात झालेला आहे महायुती सरकारला लाडक्या बहिणींचा मोठा प्रतिसाद मिळालेला आहे आणि महायुती सरकार राज्यात पुन्हा एकदा स्थापन होणार आहे परंतु लाडकी बहीण योजनेच्या नियमांमध्ये ( Ladki Bahin Yojana New Rule ) सरकारकडून बदल केले जाणार आहे त्या नियमाच्या बदलामुळे लाखो महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही तर आज आपण या संदर्भात संपूर्ण माहिती सविस्तर पाहणार आहोत.
Table of Contents
डिसेंबर महिन्याचा हप्ता या दिवशी जमा होणार
महाराष्ट्र सरकारने 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत मुख्यमंत्री माजी लाडकी बहिण योजनेच्या पात्र महिलांच्या खात्यात पाच हप्त्याचे पैसे 7500 हजार रुपये जमा केलेले आहेत आणि आता या सर्व महिला या योजनेच्या सहावी हप्त्याची वाट पाहत आहे यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर आलेला आहे आणि महायुती सरकारला स्पष्ट बहुमत मिळाले आहे.
परंतु आतापर्यंत महायुती सरकार राज्यामध्ये स्थापन झाली नाही आणि काही दिवसात सरकार स्थापन होईल त्यानंतर महिलांना या योजनेअंतर्गत सहावा हप्ता दिला जाईल त्यामुळे महिलांच्या खात्यात डिसेंबर महिन्यामध्ये या योजनेचा जमा होणार आहे.
हे पण वाचा : या महिलांच्या खात्यात ₹7500 रुपये आणि 2100 रुपये सरकार करणार जमा, पहा तुम्हाला किती मिळणार पैसे
ऑक्टोबर महिन्यात केलेले अर्ज मंजूर कधी होणार
महाराष्ट्र सरकारने राज्यातील कोणतीहि महिला या योजनेच्या लाभांपासून वंचित राहू नये याकरिता या योजनेच्या कालावधीमध्ये वाढ करून 15 ऑक्टोबर 2024 ठेवण्यात आलेली होती या कालावधीमध्ये अनेक महिलांनी अंगणवाडी केंद्र मार्फत ऑफलाईन अर्ज सादर केलेले आहेत त्यानंतर अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी अशा सर्व महिलांचे अर्ज ऑनलाईन केले परंतु अशा सर्व महिलांचा अर्ज आतापर्यंत मंजूर केलेले नाही तर अशा सर्व महिलांचे अर्ज मंजूर कधी होणार असा प्रश्न निर्माण केला जात आहे.
मीडिया रिपोर्टच्या माहितीनुसार महाराष्ट्र सरकारकडून डिसेंबर महिन्यामध्ये अशा सर्व अर्जाची पडताळणी तालुकास्तरीय समितीमार्फत केली जाणार आहे आणि लवकरच अशा सर्व महिलांना योजनेचा लाभ दिला जाणार आहे त्यामुळे महिलांनी पुन्हा काही दिवसाची प्रतीक्षा करावी.
लाखो महिलांना मिळणार नाही योजनेचा लाभ
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाखो महिलांना या योजनेचासहावा हप्ता मिळणार नाही यासंदर्भात माहिती मिळाली असता अनेक महिलांनी या योजनेच्या नियमाची उल्लंघन करून ऑनलाईन अर्ज सादर केले आणि त्यांचा अर्ज मंजूर पण करण्यात आला परंतु अनेक महिलांच्या अर्जाची पुन्हा पडताळणी केली जात आहे आणि त्यामध्ये लाखो महिला निराधार योजनेच्या लाभार्थी दिसून येत आहे .
त्यामुळे अशा सर्व महिलांना या योजनेचा सहावा हप्ता मिळणार नाही यासंदर्भात सरकारने लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर माहिती दिलेली आहे.
नमस्कार मी चंद्रकांत घोडके मागील दहा वर्षापासून सरकारी योजना संदर्भात ब्लॉगिंग व यूट्यूब च्या माध्यमातून माहिती देत आहे, त्यामुळे आपल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना च्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला जे काही माहिती दिली जात आहे ती अभ्यासपूर्वक दिली जात आहे .
3 thoughts on “Ladki Bahin Yojana New Rule : लाडकी बहीण योजना नवीन नियम लागू, लाखो महिलांना मिळणार नाही योजनेचा लाभ”