Ladki Bahin Yojana New Update : लाडक्या बहिणींना सर्वात मोठा धक्का, सरकारने केली सर्वात मोठी कारवाई

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ladki Bahin Yojana New Update In Marathi : विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली होती या योजनेअंतर्गत दोन कोटी पेक्षा अधिक महिलांना सरकारने लाभ दिलेला आहे मात्र या योजनेअंतर्गत अनेक अपात्र महिलांनी अर्ज सादर करून या योजनेचा लाभ घेतलेला आहे या महिला विरोधात कारवाई करण्याचा निर्णय सरकारने आता घेतलेला आहे

अशातच मुंबईतील 22000 महिलांना या योजनेतून वगळण्यात आले असल्याची बातमी समोर येत आहे तर आज आपण या ( Ladki Bahin Yojana New Update ) संदर्भात सविस्तर माहिती पुढे पाहणार आहोत.

लाडकी बहीण योजना 2025

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेला महाराष्ट्र सरकारने 28 जून 2024 रोजी लागू केले या योजनेची अर्ज प्रक्रिया एक जुलै 2024 ते 15 ऑक्टोंबर 2024 कालावतीमध्ये सुरू ठेवण्यात आली या कालावधीत योजनेसाठी तीन कोटीच्या जवळपास ऑनलाईन व ऑफलाइन अर्ज सरकारकडे प्राप्त झाले त्यामधील सरकारने दोन कोटी 47 लाख महिलांना या योजनेअंतर्गत लाभ दिला.

त्याचप्रमाणे सरकारने 24 जानेवारी 2025 पासून या योजनेचा सातवा हप्ता महिलांच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात केली आणि 31 जानेवारी 2025 पर्यंत या योजनेचा सातवा हप्ता महिलांचे खात्यात जमा झाला, आता महिलांच्या खात्यात लवकरच या योजनेचा आठवा हप्ता जमा केला जाणार आहे.

सरकारने केली सर्वात मोठी कारवाई

मीडिया रिपोर्टची माहितीनुसार मुंबईत लाडक्या बहिणीच्या अर्जाची छाननी सुरू आहे या छाननी दरम्यान 22,000 हजार महिलांना लाडकी बहीण योजनेतून अपात्र केली असल्याची माहिती समोर येत आहे यापैकी काही महिलांकडे चार चाकी वाहन आहे तर काही महिलां स्वतः नोकरी करत असल्याने त्यांना या योजनेतून वगळण्यात आले असल्याची माहिती समोर येत आहे.

Ladki Bahin Yojana New Update
Ladki Bahin Yojana New Update

लाडकी बहीण योजना सरकारने सुरू केली तेव्हा काही निकष ठेवले होते मात्र अनेक महिलांनी या योजनेच्या निकषांचे पालन न करता या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज सादर केला मात्र अशा महिलावर आता कारवाई करण्यात सुरुवात झालेली आहे व त्याच प्रमाणे त्या महिलांकडून पैसे परत पण घेतले जाणारा अशी माहिती समोर पण येत आहे.

अशाप्रकारे होणार महिलांच्या अर्जाची पडताळणी

महिला व बाल कल्याण विभाग आणि जिल्हा प्रशासनाने लाडकी बहिण योजनेच्या अर्जाची पडताळणी करण्यास सुरुवात केली आहे जिल्हाधिकारी यांच्या पातळीवर लाभार्थ्यांची यादी वर्गीकृत केली जाणार आहे व त्यानुसार महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षिका आणि अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन प्रत्यक्ष चौकशी करत आहे या चौकशी दरम्यान लाभार्थी महिलांच्या आर्थिक स्थितीची चौकशी केली जाणार व चारचाकी वाहन असणाऱ्या व निकषात बसणाऱ्या कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ देण्यात येणार नाही.

काय आहेत लाडकी बहीण योजनेची निकष

  • लाभार्थी महिलांचे वय 21 ते 65 वयोगटातील असावे.
  • लाभार्थी कुटुंबाची वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा अधिक नसावे
  • लाभार्थी कुटुंबातील सदस्य सरकारीवर नसावा.
  • लाभार्थी कुटुंबात सदस्य आयकर दाता नसावा
  • महिला संजय गांधी निराधार योजना व इतर शासनाच्या आर्थिक योजनेतील लाभार्थी नसावी
  • महिलांच्या कुटुंबाच्या सदस्य च्या नावावर चार चाकी वाहन नसावी

Ladki Bahin Yojana 3.0 Registration 2025

Leave a Comment