Ladki Bahin Yojana Six Installment News In Marathi : राज्यातील लाडक्या बहिणींना संक्रांती आधी फडवणीस सरकार मोठं गिफ्ट देणार येणार आहे डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे दोन हप्ते 3000 हजार रुपये संक्राती आधी लाडक्या बहिणींना मिळणार आहेत त्यामुळे महिलांची संक्राती गोड होणार आहे तर आज आपण या संदर्भात सविस्तर माहिती पुढे पाहणार आहोत.
लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटी रुपयांची तरतूद
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेला राज्यभरातून महिलांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळालेला आहे विधानसभा निवडणुकीमध्ये ही योजना महायुती सरकारला मोठे यश प्राप्त करून दिलेली आहे ही योजना जुलै महिन्यामध्ये सुरू झाली आणि महिलांना ह्या योजनेअंतर्गत नोव्हेंबर पर्यंत सर्व हप्ते देण्यात आले त्यामुळे महिलांनी विधानसभा निवडणुकीमध्ये मोठ्या संख्येने मतदान केले आणि राज्यात पुन्हा एकदा महायुती सरकार स्थापन झाले.
त्यामुळे लाडक्या बहिणींना या योजनेचा पुन्हा लाभ देण्यासाठी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटी रुपयांचे तरतूद करण्यात आली आहे.
डिसेंबर जानेवारीचे ₹3000 रुपये एकत्र मिळणार
महाराष्ट्र राज्यातील 2 कोटी 34 लाख महिला लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता कधी मिळणार याकडे लक्ष लागलेला आहे अशातच महिलांसाठी खुशखबर समोर येत आहे महाराष्ट्र सरकारकडून संक्राती आधी डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे मिळून 3000 हजार रुपये जमा करण्यात येणार असल्याची माहिती सूत्राकडून मिळत आहे.
हे पण वाचा : अर्ज मंजूर पण जमा झाला नाही एकही हप्ता ? लगेच करा या 7 गोष्टी तात्काळ जमा होतील पैसे
महिलांना 2100 रुपये महिना कधीपासून मिळणार
महायुतीच्या अनेक नेत्यांकडून विधानसभा निवडणुकीदरम्यान महिलांना आश्वासन देण्यात आले होते की राज्यामध्ये पुन्हा एकदा महायुती सरकार आल्यास लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणाऱ्या रकमेत वाढ करून 2100 रुपये महिना देऊ आणि लाडक्या बहिणीच्या आशीर्वादाने राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुती सरकार स्थापन झाले तर आता महिला योजनेअंतर्गत 2100 रुपये महिना कधी मिळणार याकडे लक्ष लागले आहे.
अशातच सूत्राने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील लाडक्या बहिणींना 2100 रुपये महिना देण्यासंदर्भात सरकारकडून अद्याप आतापर्यंत कोणताच निर्णय घेण्यात आलेली नाही परंतु राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रचार माध्यमातून बोलताना ते म्हणाले की आम्ही जे आश्वासन महिलांना दिलेले आहे ते आश्वासन आम्ही नक्की पूर्ण करणार परंतु हे पैसे महिलांना कधीपासून मिळण्यास सुरुवात होईल या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार महायुती सरकारकडून मार्च महिन्यातील अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेच्या वाढीव हप्ता संदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे.
नमस्कार मी चंद्रकांत घोडके मागील दहा वर्षापासून सरकारी योजना संदर्भात ब्लॉगिंग व यूट्यूब च्या माध्यमातून माहिती देत आहे, त्यामुळे आपल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना च्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला जे काही माहिती दिली जात आहे ती अभ्यासपूर्वक दिली जात आहे .