Majhi Ladki Bahin Yojana New GR : महाराष्ट्र राज्याचा 2024-25 चा अर्थसंकल्प राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून सादर करण्यात आला त्यामध्ये महिलाला केंद्रबिंदू मध्ये ठेवून अनेक योजनांची घोषणा करण्यात आली आणि सर्वात महत्वाची म्हणजे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेचे माध्यमातून राज्यातील आर्थिक दृष्ट्या कमजोर परिवारातील महिलांना महाराष्ट्र शासनाकडून 1500 रुपये प्रति महिना देण्यात येणार आहे परंतु शासनाने या योजनेमध्ये नवीन बदल केली आहे चला तर मग जाणून घेऊया काय शासनाच्या नवीन जीआर मध्ये .
शासनाचे नवीन नियम काय आहे
महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी सुरवातीला मोठ्या प्रमाणात अटी लागू केल्या होत्या त्या अटीमुळे महाराष्ट्र राज्यातील महिलांना कागदपत्र तयार करण्यासाठी परिश्रम करावा लागत होता ह्या सर्व बाबीला सरकारने लक्ष देऊन कागदपत्राच्या अटींमध्ये मोठ्या प्रमाणात बदल केले याची माहिती खालील प्रमाणे आहे
- नवविवाहित महिलेचे नाव राशन कार्ड मध्ये नसेल तर त्यांना विवाह नोंदणी प्रमाणपत्र सादर करावे लागेल
- महिलेच्या पतीचे राशन कार्ड उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरल्या जाईल
- अन्य राज्यात जन्म झालेली महिला महाराष्ट्र राज्यातील व्यक्तीसोबत विवाह केला आहे
- अशा महिलांना त्यांच्या पतीचे ( जन्म दाखला, शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र, किंवा अधिवास प्रमाणपत्र, राशन कार्ड , मतदान कार्ड ) यापैकी एक कागदपत्र सादर करावा लागेल
- मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्टाचे खाते देऊ शकता
- योजनेचा अर्ज करतेवेळी महिलाचा लाईव्ह फोटो घेणे अनिवार्य नाही
हे वाचा : MAZI LADKI BAHIN YOJANA ONLINE FORM PDF : माझी लाडकी बहीण योजना अर्ज फार्म डाउनलोड लिंक
GR नुसार आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- महिलांच्या नावे वैयक्तिकत बँक पासबुक
- अधिवास प्रमाणपत्र ( जन्म दाखला, शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र, राशन कार्ड प्रमाणपत्र, मतदान कार्ड ) यापैकी एक
- हमीपत्र
- अर्ज फॉर्म
- अन्य राज्यात जन्म झालेली महिला साठी ( पतीचे ( जन्म दाखला, शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र, किंवा अधिवास प्रमाणपत्र, राशन कार्ड , मतदान कार्ड ) यापैकी एक
अशा प्रकारे महाराष्ट्र शासनाने सुरुवातीला जाहीर केलेल्या शासन निर्णयामध्ये बदल करण्यात आलेले आहे आता मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणे अगदी सोपे झाले आहे
Majhi Ladki Bahin Yojana New GR Link
File Name | Majhi Ladki Bahin Yojana New GR pdf |
Size | 313kb |
Download Link | Click Here |
Ladki Bahin Maharashtra Important Link
Ladki Bahin Yojana Official Website Portal Apply Link | Click Here |
re-Apply Ladki Bahin Yojana Reject Form | Click Here |
नमस्कार मी चंद्रकांत घोडके मागील दहा वर्षापासून सरकारी योजना संदर्भात ब्लॉगिंग व यूट्यूब च्या माध्यमातून माहिती देत आहे, त्यामुळे आपल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना च्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला जे काही माहिती दिली जात आहे ती अभ्यासपूर्वक दिली जात आहे .