Majhi Ladki Bahin Yojana Update : आचारसंहिता संपली , लाडक्या बहिणींनो आजच करा हे काम, नाही तर मिळणार नाही पैसे

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Majhi Ladki Bahin Yojana Update In Marathi : महायुती सरकारने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली या योजनेअंतर्गत अडीच लाखा पेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिलांना या योजनेच्या माध्यमातून दर महिन्याला दीड हजार रुपये देण्यात येत आहे या योजनेचा लाभ घेऊन महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम होतील आणि त्यांना आर्थिक स्वतंत्र मिळेल या उद्देशाने ही योजना राबविण्यात येत आहे.

या योजनेअंतर्गत महायुती सरकारकडून नोव्हेंबर महिन्यापर्यंतचे पाच हप्त्याचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहेत आणि लवकरच डिसेंबर महिन्याचा देखील हप्ता महिलांच्या खात्यात जमा होणार आहे त्याचप्रमाणे या योजनेच्या लाभापासून राज्यातील कोणतीही महिला वंचित राहू नये याकरिता या योजनेच्या अर्ज करण्याच्या कालावधीमध्ये वाढ करून 15 ऑक्टोबर 2024 ठेवण्यात आली होती या कालावधीमध्ये अनेक महिलांनी ऑनलाईन व ऑफलाइन अर्ज सादर केले.

अशा सर्व महिलांचे अद्याप आतापर्यंत अर्ज मंजूर करण्यात आलेली नाही अशातच अशा सर्व महिलांसाठी या मोठी अपडेट समोर येत आहे या सर्व महिलांसाठी सरकारकडून काही निर्देश जारी करण्यात आलेले आहेत जर महिलांनी या बाबीवर लक्ष दिले नाही तर अशा सर्व महिला या योजनेच्या लाभापासून कायमस्वरूपी वंचित राहू शकतात तर चला तर पाहूया यासंदर्भात संपूर्ण माहिती.

महायुती सरकारकडून करण्यात आली मोठी घोषणा

महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर आलेला आहे आणि या निवडणुकीमध्ये लाडकी बहीण योजना हा प्रचारामध्ये प्रमुख मुद्दा बनलेला होता या योजनेचा महायुती सरकारला मोठा फायदा झालेला आहे त्याचप्रमाणे महायुतीचे सरकार राज्यात पुन्हा सत्तेत आल्यानंतर लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये ऐवजी 2100 देऊ अशी घोषणा करण्यात आली होती.

हे पण वाचा : लाडकी बहीण योजना नवीन नियम लागू, लाखो महिलांना मिळणार नाही योजनेचा लाभ

Majhi Ladki Bahin Yojana Update
Majhi Ladki Bahin Yojana Update

लाडक्या बहिणींनो आजच करा हे काम

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजने संदर्भात मोठी अपडेट समोर येत आहे महाराष्ट्र राज्यामधील आचारसहिता संपली आहे, महायुती सरकारने राज्यातील प्रत्येक गरीब कुटुंबातील महिलांना लाभ मिळावा आणि कोणतीही महिला योजनेपासून वंचित राहू नये याकरिता 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती आणि त्यानंतर 16 ऑक्टोबरला विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आणि राज्यात आचारसहिता लागू झाली त्यामुळे या कालावधीमध्ये केलेल्या अर्जाची पडताळणी करणे बाकी राहिले.

मात्र आता आचारसहिता संपल्यानंतर उर्वरित सर्व अर्ज छाननी प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे त्यानंतर अशा सर्व महिलांची अंतिम यादी तयार करून लाभ देण्यात येणार आहे परंतु अनेक अर्जा मध्ये त्रुटी आढळून आली आहे त्या त्रुटी दूर करून महिलांना अर्ज पुन्हा सादर करावा लागतो आणि जर अर्ज पुन्हा सादर केला नाही तर अशा महिला या योजनेच्या लाभापासून वंचित राहू शकतात त्याकरिता महिलांनी आपले अर्ज मंजूर झाले का नाही हे तपासून घ्यावे व त्रुटी आल्यास ती दुरुस्त करून घ्यावी.

2 thoughts on “Majhi Ladki Bahin Yojana Update : आचारसंहिता संपली , लाडक्या बहिणींनो आजच करा हे काम, नाही तर मिळणार नाही पैसे”

Leave a Comment