Ladki Bahin Yojana Aadhar Link : महाराष्ट्र सरकारने लाडकी बहिण योजनेचा पहिला हप्ता जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा मिळून एक कोटी दोन लाख महिलांच्या खात्यामध्ये जमा केलेला आहे परंतु राज्यातील अशा लाखो महिला आहेत ज्यांचे अर्ज मंजूर झाले आहेत परंतु योजनेचा पैसा त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही .
त्यामुळे सरकारकडून या संदर्भात स्पष्ट सांगण्यात आलेली आहे की लाभार्थ्यांनी आपले बँक खाते आधार लिंक करून घ्यावे जर त्यांचे बँक खाते आधार लिंक राहणार नाही तर त्यांच्या खात्यामध्ये या योजनेचा पहिला हप्ता जमा होणार नाही.
तर आज आपण लाडकी बहीण योजनेसाठी आपले खाते आधार लिंक कशाप्रकारे करायचे तो फॉर्म कुठे भेटतो आणि त्याची प्रक्रिया काय ? या संबंधित संपूर्ण माहिती तुम्हाला मी पुढे देणार आहे .
Table of Contents
Ladki Bahin Yojana Aadhar Link Overview
योजनेचे नाव | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2024 |
योजनेची घोषणा | राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून या योजनेची घोषणा करण्यात आली |
योजनेची अंमलबजावणी | 28 जून 2024 |
योजनेची लाभार्थी | राज्यातील महिला |
आर्थिक मदत | दर महिन्याला 1500 रुपये |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन व ऑफलाइन |
Ladki Bahin Yojana Official Website | https://ladakibahin.maharashtra.gov.in/ |
हेल्पलाइन नंबर | 181 |
लाडकी बहीण योजना संबंधित थोडक्यात माहिती
महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील कमी उत्पन्न असणाऱ्या महिलांना त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्य साठी महाराष्ट्र सरकार दर महिन्याला पंधराशे रुपये देणार आहे या पैशाचा वापर करून राज्यातील महिला त्यांच्या परिवारचा सांभाळ करू शकतील या उद्देशाने ही योजना महाराष्ट्र भर लागू केले आहे
हे पण वाचा : लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची नवीन प्रक्रिया, अर्ज करा मोबाईल ने फक्त 5 मिनिटात
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार महिलेचे वय 21 ते 65 वर्ष असणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे अर्जदार महिला ही महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे व तसेच योजनेची अर्ज प्रक्रिया 1 जुलै 2024 ते 31 सप्टेंबर 2024 ठेवण्यात आलेली आहे
महाराष्ट्र सरकारने या योजनेचा पहिला हप्ता जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा मिळून 3000 रुपये पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आला आहे .
Ladki Bahin Yojana Aadhar Link प्रक्रिया
महाराष्ट्र सरकारने 14 ऑगस्ट पासून या योजनेचा पहिला हप्ता वितरित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे लाखो महिलांच्या खात्यामध्ये या योजनेचा पैसा पण जमा झालेला आहे परंतु अनेक महिलांचे खाते आधार लिंक नसल्यामुळे त्यांना या योजनेचा पहिला हप्ता मिळाला नाही
तर त्यांच्या मनामध्ये प्रश्न येतो की आधार लिंक कशाप्रकारे करायचे आणि कुठे करायचं तर आम्ही तुम्हाला खाली काही स्टेप दिली आहे त्यांना फॉलो करून तुम्ही तुमचे बँक खाते आधार लिंक करू शकता.
- आधार लिंक करण्यासाठी तुम्हाला बँक शाखा मध्ये जावावे लागेल
- त्यानंतर बँक अधिकाऱ्याकडून तुम्हाला आधार लिंक फॉर्म घ्यायचा आहे
- आधार लिंक फॉर्ममध्ये मागितली सर्व माहिती अचूक पद्धतीने भरून व सिग्नेचर करून घ्यावी
- आधार लिंक फॉर्म सोबत तुम्हाला आधार कार्ड व तुमचे पासबुकची झेरॉक्स कॉपी जोडावी लागेल
- त्यानंतर तुम्ही आधार लिंक फॉर्म बँक अधिकारी जवळ जमा करायचा आहे
- बँक अधिकारी द्वारे तुमचे खाते आधार लिंक केले जाईल
- तुमचे खाते आधार लिंक झाल्यानंतर या योजनेचा पैसा काही दिवसांमध्ये तुमच्या खात्यामध्ये जमा होईल
अशाप्रकारे तुम्ही बँक शाखेमध्ये जाऊन Offline पद्धतीने तुमचे खाते आधार लिंक करू शकता
Ladki Bahin Aadhar Link Form Pdf
File Name | Ladki Bahin Aadhar Link Form Pdf Download |
Size | 32kb |
Download Link | Click Here |
Ladki Bahin Yojana Important Link
Ladki Bahin Yojana Official Website Portal Apply Link | Click Here |
Ladki Bahin Online Aadhar Link | Click Here |
Ladki Bahin Aadhar Link Check | Click Here |
re-Apply Ladki Bahin Yojana Reject Form | Click Here |
नमस्कार मी चंद्रकांत घोडके मागील दहा वर्षापासून सरकारी योजना संदर्भात ब्लॉगिंग व यूट्यूब च्या माध्यमातून माहिती देत आहे, त्यामुळे आपल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना च्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला जे काही माहिती दिली जात आहे ती अभ्यासपूर्वक दिली जात आहे .
8 thoughts on “Ladki Bahin Yojana Aadhar Link : लाडकी बहीण योजनेसाठी आधार लिंक असे करा, तुरंत जमा होतील पैसे”