CM Majhi Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे ही योजना मागील झालेल्या 2024-25 अर्थसंकल्पा निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील राज्य सरकारने जुलै 2024 पासून सुरू केली आहे.
या त्याचप्रमाणे सरकारने या योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख वाढवली आहे आणि अर्ज स्वीकारणे व अर्ज मंजूर करण्याचा अधिकार फक्त अंगणवाडी सेविकाला देण्यात आले आहे तर आज आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे किती महिलांना पैसे मिळाले यासंदर्भात सरकारने जाहीर केली आकडेवारी पाहूया.
राज्य सरकारने वाढवली अर्ज करण्याची तारीख
महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2024 दिली होती त्यानंतर राज्य सरकारच्या काही दिवसा अगोदर झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय घेतलेला आहे आणि आता या योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 30 सप्टेंबर 2024 ठेवण्यात आलेली आहे.
अर्ज मंजूर करणार फक्त अंगणवाडी सेविका
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली तेव्हा अर्जना मान्यता देण्याचा अधिकार विविध घटकांना देण्यात आलेला होता आणि त्याचप्रमाणे अर्ज करण्यासाठी पण विविध पर्याय उपलब्ध होते मात्र एका व्यक्तीने या योजनेसाठी आपल्या पत्नीच्या नावे तब्बल 30 अर्ज सादर केले होते आणि त्यापैकी 26 अर्ज मंजूर झालेले होते यासंदर्भात तक्रार प्राप्त झाल्यानंतर ही माहिती उघडीस आली त्यानंतर या योजने संदर्भात असा प्रकार पुन्हा होऊ नये म्हणून सरकारने फक्त अंगणवाडी सेविकाकडे अर्ज मंजूर करण्याचा अधिकार देण्यात आला आहे.
हे पण वाचा : ऑनलाइन अर्ज प्रक्रिया बंद,अशा प्रकारे करावे लागेल अर्ज सादर, सरकारने घेतला मोठा निर्णय
राज्यामध्ये किती महिलांना मिळाले पैसे
महाराष्ट्र सरकारने जुलै आणि ऑगस्ट महिन्याची मिळून तीन हजार रुपये दोन टप्प्यांमध्ये पात्र महिलांच्या खात्यात जमा केलेली आहे योजनेचा पहिल्या टप्पा 14 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट च्या कालावधीमध्ये महिलांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात आलेला आहे आणि त्याच प्रमाणे दुसरा टप्पा हा 29, 30 आणि 31 ऑगस्ट या कालावधीमध्ये महिलांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात आलेला आहे या दोन्ही टप्प्याचे मिळून 1 कोटी 59 लाख महिलांना 4787 कोटी रुपयांचा लाभ देण्यात आले आहे अशी माहिती सरकारकडून देण्यात आलेली आहे.
CM Majhi Ladki Bahin Yojana Important Link
Ladki Bahin Yojana 2nd Installment List | Click Here |
Ladki Bahin Online Aadhar Link | Click Here |
Ladki Bahin Online Aadhar Link Check | Click Here |
Ladki Bahini Yojana Online Apply Link | Click Here |
नमस्कार मी चंद्रकांत घोडके मागील दहा वर्षापासून सरकारी योजना संदर्भात ब्लॉगिंग व यूट्यूब च्या माध्यमातून माहिती देत आहे, त्यामुळे आपल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना च्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला जे काही माहिती दिली जात आहे ती अभ्यासपूर्वक दिली जात आहे .
1 thought on “CM Majhi Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचे पैसे किती महिलांना मिळाले ? सरकारने जाहीर केली आकडेवारी”