Mukhyamantri Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू असलेली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेला महाराष्ट्रभरातून महिलांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळताना दिसत आहे सरकारने महिलांना दिलेला शब्द पाळत या योजनेअंतर्गत लाखो महिलांच्या खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्याची मिळून तीन हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले आहेत आणि उर्वरित महिलांना लवकरच या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.
सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी जे काही पर्याय उपलब्ध केलेले होते महिला व्यक्तिगत किंवा सेतू केंद्रामध्ये जाऊन ऑनलाईन अर्ज सादर करू शकत होत्या परंतु सरकारने काही दिवसा अगोदर एक शासन निर्णय काढलेला होता त्यामध्ये त्यांनी फक्त अंगणवाडी केंद्र मार्फत अर्ज स्वीकारले जातील असे सांगण्यात आले होते परंतु सरकारच्या ह्या निर्णयामुळे राज्यातील लाखो महिला या योजनेपासून वंचित राहण्याच्या मार्गावर आहे या संदर्भात संपूर्ण माहिती आपण पुढे सविस्तर बघूया.
Table of Contents
Mukhyamantri Ladki Bahin Yojana
महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे या योजनेसाठी राज्यभरातून दोन कोटी पेक्षा अधिक महिलांनी ऑनलाइन अर्ज सादर केले आहे त्यामधील लाखो महिलांना या योजनेअंतर्गत लाभ मिळाला आहे परंतु अशा अनेक महिला आहेत ज्यांनी योजनेसाठी ऑनलाईन अर्ज केलेली नाही अशा सर्व लाभ मिळावा म्हणून अर्ज करण्याच्या कालावधीमध्ये वाढ करून 30 सप्टेंबर 2024 ठेवलेली आहे .
हे पण वाचा : Ladki Bahin Yojana ReApply : कायमस्वरूपी रिजेक्ट झालेला अर्ज असा करा सादर, पहा सविस्तर माहिती
योजनेचे अर्ज फक्त अंगणवाडी स्वीकारतील
काही दिवसा अगोदर एका व्यक्तीने आपल्या पत्नीच्या नावे तब्बल 30 ऑनलाईन अर्ज सादर केलेले होते त्यामधील 26 अर्ज मंजूर होऊन त्या महिलांना 26 अर्जाचे पैसे मिळाले पण होते अशा प्रकारच्या वाढत्या गैप्रकारामुळे सरकारने मागील काही दिवसांमध्ये एक शासन निर्णय काढलेला होता त्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितले होते की आता इथून पुढे या योजनेसाठी अर्ज फक्त अंगणवाडी कर्मचारी स्वीकारतील आणि इतर अर्ज करण्याचे पर्याय सरकारकडून बंद करण्यात आले.
अशाप्रकारे करावे लागेल योजनेसाठी अर्ज
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा ( Mukhyamantri Ladki Bahin Yojana )लाभ घेण्यासाठी सरकारने सुरुवातीला ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू केली होती आणि महिलांना सेतू केंद्रामार्फत किंवा व्यक्तिगत या योजनेसाठी ऑनलाईन सादर करू शकत होत्या परंतु सरकारने काही दिवसा अगोदर एक शासन निर्णय काढला आणि त्यामध्ये अंगणवाडी कर्मचारी मार्फत फक्त अर्ज स्वीकारले जातील असे त्यामध्ये स्पष्ट केले
हे पण वाचा : आनंदाची बातमी ₹4500 हजार रुपये या दिवशी जमा होणार, फक्त याच महिलांना मिळणार पैसे, पहा संपूर्ण माहिती
आता महिलांना सरकारने सांगितलेले सर्व कागदपत्र तयार करून ऑफलाइन पद्धतीने आपल्या जवळच्या अंगणवाडी केंद्रामध्ये भेट देऊन आपले अर्ज सादर करायचे आहे त्यानंतर अंगणवाडी कर्मचारी आपले अर्ज ऑनलाईन करतील आणि त्यानंतर महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.
महिला राहणार योजनेपासून वंचित
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना ऑफलाईन अर्ज अंगणवाडी कर्मचारी यांच्याकडे सादर करायचा आहे, सकाळ च्या मीडिया रिपोर्टच्या माहितीनुसार शहरातील अकोला फाटा येथील लक्ष्मी संतोष थोरात या महिलेने दोन महिन्यापूर्वी नगरपंचायत मध्ये ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर केलेला होता ही महिला अनेक वेळा बँकेत जाऊन पैसे जमा झाले का नाही ते पाहत होती यासंदर्भात पूर्ण चौकशी केल्यानंतर या बहिणीचा अर्ज ऑनलाईनच केला गेलेला नव्हता.
त्यानंतर त्या महिलांनी जवळच्या अंगणवाडी कर्मचारी महिलेकडे जाऊन पुन्हा एकदा अर्ज सादर करण्याची विनंती केली परंतु त्यांना सांगण्यात आले की अर्ज भरण्याची वेबसाईट बंद झालेली आहे, ती उघडत नाही, एक कोड नंबर मागत आहे, जन्म तारखेचे प्रमाणपत्र असल्याशिवाय अर्ज करता येणार नाही, असे अनेक कारणे त्या महिलांना देण्यात आले अशा शुल्क कारणामुळे व त्याच प्रमाणाने अनआवश्यक कागदपत्रामुळे महिला या योजनेपासून वंचित राहत आहे .
अशा सर्व बाबीवर सरकारने लक्ष देऊन या योजनेचा लाभ कशाप्रकारे सामान्य महिला पर्यंत पोहोचता येईल आणि महिलांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी अडचणी येऊ नये अशी सुविधा शासनाकडून करावी ही विनंती महिला कडून करण्यात येत आहे .
Ladki Bahin Yojana Important Link
Ladki Bahin Online Aadhar Link | Click Here |
Ladki Bahin Online Aadhar Link Check | Click Here |
नमस्कार मी चंद्रकांत घोडके मागील दहा वर्षापासून सरकारी योजना संदर्भात ब्लॉगिंग व यूट्यूब च्या माध्यमातून माहिती देत आहे, त्यामुळे आपल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना च्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला जे काही माहिती दिली जात आहे ती अभ्यासपूर्वक दिली जात आहे .