Majhi Ladki Bahin Yojana Update News In Hindi : महाराष्ट्र सरकारने सुरू केलेले मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 2 कोटी 22 लाख महिलांना लाभ देण्यात आलेला आहे आणि उर्वरित महिलांच्या खात्यात लवकरच ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे जमा होतील आणि त्याच प्रमाणे राज्यात एकही महिला या योजनेपासून वंचित राहणार नाही अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री आदित्य ठाकरे यांनी छत्रपती संभाजीनगर येथील एका कार्यक्रमात दिली.
अशातच महिलांसाठी पुन्हा एक आनंदाची बातमी समोर येत आहे महाराष्ट्र सरकारकडून लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यात वाढ करण्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून देण्यात आलेली आहे चला तर पाहूया या संदर्भात संपूर्ण माहिती.
ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे महिलांच्या खात्यात जमा
महाराष्ट्र सरकारने लाडक्या बहिणीची दिवाळी गोड करण्यासाठी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे मिळून तीन हजार रुपये पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे त्यामध्ये लाखो महिलांना च्या बँक खात्यात पैसे जमा झालेले आहेत आणि उर्वरित महिलांना 10 ऑक्टोबर पर्यंत लाभ मिळेल अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
सरकार करणार लाडक्या बहिणीच्या हप्त्यात वाढ
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे छत्रपती संभाजीनगर येथील कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू राहावी यासाठी सरकारकडून आर्थिक तरतूद करण्यात आलेली आहे आणि ही योजना बंद तर पडणारच नाही असे ते म्हणाले उलट लाडकी बहीण योजनेच्या लाभाच्या रकमेमध्ये टप्प्याटप्प्याने वाढ करू असा शब्द पण मुख्यमंत्री यांनी लाडक्या बहिणींना दिला.
लाडक्या बहिणींनो पैसे आले नाही ? तात्काळ करा हे 4 काम
नमस्कार मी चंद्रकांत घोडके मागील दहा वर्षापासून सरकारी योजना संदर्भात ब्लॉगिंग व यूट्यूब च्या माध्यमातून माहिती देत आहे, त्यामुळे आपल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना च्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला जे काही माहिती दिली जात आहे ती अभ्यासपूर्वक दिली जात आहे .