Ladki Bahin Yojana Big News In Marathi : महाराष्ट्र राज्यामध्ये बहुचर्चित असलेली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजने संदर्भात मोठा निर्णय घेण्यात आलेला या निर्णयामुळे महाराष्ट्र राज्यातील लाखो महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही कारण ही योजना महाराष्ट्र राज्याचे महिला व बाल विकास विभागाने बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे तर या योजनेचे पुढील हप्ते मिळणार का आणि योजना पुन्हा कधी सुरू होणार या संदर्भात संपूर्ण माहिती आपण सविस्तर पुढे पाहणार आहोत.
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब परिवारातील महिलांना महाराष्ट्र सरकार दर महिन्याला 1500 रुपये देत आहे या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 2 कोटी 34 लाख महिलांना ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे मिळाले आहे परंतु निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर आता उर्वरित महिलांच्या खात्यात अद्याप हप्ता जमा होणार नाही आहे.
Table of Contents
या कारणामुळे बंद झाली लाडकी बहिण योजना
महाराष्ट्र राज्यामध्ये अवघ्या काही दिवसांमध्ये विधानसभा निवडणूक आहे त्यामुळे मतदारावर आर्थिक लाभ देऊन प्रभाव टाकणारी योजना ताबडतोब थांबविल्या जाव्या अशा सूचना मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यातून सर्व प्रशासकीय विभागाला देण्यात आल्या आर्थिक लाभ देणाऱ्या योजना कोणत्या आहेत
या संदर्भात आढावा घेण्यात आला मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी राज्यातील सर्व विभागाकडे याबाबत विचारणा केली असता त्यामध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेकडे लक्ष वेधले त्यामुळे निवडणुकीच्या आचारसंतेमुळे तूर्तास ही योजना थांबवण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे.
हे पण वाचा : या महिलांना मिळणार 5500 रुपये दिवाळी बोनस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली शेवटची मोठी घोषणा
10 लाख महिलांच्या खात्यावर जमा होणार नाहीत पैसे
महायुतीच्या सरकारने महिलांची काळजी घेत 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ऑक्टोबर व नोव्हेंबर पर्यंतचे सर्व हप्ते 2 कोटी 34 लाख महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले परंतु अशा 10 लाख महिला आहेत ज्यांना वेळेअभावी त्यांच्या खात्यात ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्याचे पैसे जमा झाले नाहीत अशी माहिती विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
लाडकी बहीण योजनेचे पुढील हप्ते कधी मिळणार
आता महिलांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होणार की ही योजना कायमस्वरूपी बंद झाली का तर असे काही नाही ही योजना कायमस्वरूपी बंद झाली नाही आहे सरकारने महिलांची काळजी घेत 2 कोटी 34 लाख महिलांच्या खात्यात अगोदरच नोव्हेंबर पर्यंत सर्व हप्ते जमा केलेले आहेत उर्वरित काही महिलांना काही तांत्रिक अडचणीमुळे व वेळेअभावी त्यांना हा लाभ मिळाला नाही अशा सर्व महिलांना विधानसभा निवडणूक पूर्ण झाल्यानंतर उर्वरित सर्व हप्त्याचे पैसे महिलांच्या खात्यात जमा होतील आणि ही योजना व्यवस्थितपणे पुन्हा सुरू राहील.
नमस्कार मी चंद्रकांत घोडके मागील दहा वर्षापासून सरकारी योजना संदर्भात ब्लॉगिंग व यूट्यूब च्या माध्यमातून माहिती देत आहे, त्यामुळे आपल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना च्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला जे काही माहिती दिली जात आहे ती अभ्यासपूर्वक दिली जात आहे .