Ladki Bahin New Update In Marathi : माजी लाडकी बहीण योजना या योजनेच्या मदतीने विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश प्राप्त झालेले आहे लाडक्या बहिणीच्या आशीर्वादाने महायुतीला राज्यात 288 पैकी 235 जागेवर विजय प्राप्त झालेला आहे या योजनेच्या माध्यमातून महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जात आहे आतापर्यंत सरकारने पाच हप्त्याचे पैसे महिलांच्या खात्यात जमा केलेले आहेत.
आतापर्यंत सरकारकडून दोन कोटी चाळीस लाख महिलांना लाभ देण्यात आलेला आहे तसेच निवडणूक नंतर महायुतीचे सरकार आल्यास या योजनेअंतर्गत 2100 रुपये महिना दिला जाईल असे आश्वासन पण महायुती कडून करण्यात आले आहे परंतु आता प्रशासनाकडून लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या अर्जाची पुन्हा पडताळणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे तर आज आपण या संदर्भात संपूर्ण माहिती पुढे पाहणार आहोत.
Table of Contents
महिलांना मिळणार आता 2100 रुपये महिना
महायुतीकडून वचननाम्यामध्ये जाहीर करण्यात आले होते की राज्यामध्ये महायुती सरकार पुन्हा आल्यास महिलांना लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याच्या रकमेत वाढ करून पंधराशे रुपये ऐवजी 2100 रुपये देऊ असे आश्वासन देण्यात आले होते आणि महिलांच्या आशीर्वादाने राज्यात महायुती सरकार आज स्थापन होणार आहे महाराष्ट्र राज्याला नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत.
लाडक्या बहिणीच्या अर्जाची होणार पुन्हा पडताळणी
अर्थ विभागातील सूत्रांनी फ्री प्रेस जनरलला दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना साठी पात्र ठरलेल्या सर्वच महिलांची पुन्हा अर्ज पडताळणी केली जाणार आहे फक्त गरजू महिलांना या योजनेचा लाभ व्हावा यासाठी ही पडताळणी करण्यात येणार आहे पडताळणीमध्ये निकषांची पुरता करणाऱ्या नसतील त्यांना सदर योजनेतून अपात्र करण्यात येणार आहे
हे पण वाचा : 48 तासात लाडकी बहीण योजनेचे पैसे होणार जमा, पहा तुम्हाला किती मिळणार पैसे
लाडक्या बहिणीच्या खात्यात सहावा हप्ता या दिवशी होणार जमा
महाराष्ट्र राज्यातील मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला या योजनेच्या सहाव्या हप्त्याची प्रतिक्षे मध्ये आहे महिलांच्या आशीर्वादाने महाराष्ट्र राज्यामध्ये पुन्हा महायुती सरकार आज स्थापन होणार आहे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये श्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत आणि आता लाडकी बहीण योजनेच्या सहाव्या त्याचे पैसे 2100 रुपये महिलांच्या खात्यात पुढील काही दिवसांमध्ये जमा होण्याची शक्यता आहे.
नमस्कार मी चंद्रकांत घोडके मागील दहा वर्षापासून सरकारी योजना संदर्भात ब्लॉगिंग व यूट्यूब च्या माध्यमातून माहिती देत आहे, त्यामुळे आपल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना च्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला जे काही माहिती दिली जात आहे ती अभ्यासपूर्वक दिली जात आहे .