Ladki Bahin Yojana Instruction : हे काम करा तरच मिळतील लाडकी बहीण योजनेचे पैसे, सरकारने जारी केले निर्देश

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ladki Bahin Yojana Instruction News In Marathi : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 19 डिसेंबर 2024 रोजी सभागृहात लाडकी बहिणी योजने संदर्भात महत्त्वाची माहिती दिली त्यांनी म्हटले की अधिवेशन संपल्यावर लाडक्या बहिणीच्या खात्यात डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा केला जाईल परंतु लाखो महिला वंचित राहू नये यासाठी या योजने संदर्भात काही निर्देश देण्यात आले आहेत ते आपण सविस्तर पुढे पाहणार आहोत.

लाडकी बहीण योजना ठरली गेम चेंजर

महाराष्ट्र सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आणि दोन कोटी 34 लाख महिलांना या योजनेअंतर्गत लाभ देण्यात आला या योजनेचा फायदा महायुती सरकारला विधानसभा निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात झाला आणि महायुती सरकार राज्यात पुन्हा स्थापन झाली या योजनेच्या मदतीने राज्यातील महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील आणि त्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागू नये या उद्देशाने सरकारने योजना लागू केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले

महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल सभागृह महत्वाची माहिती दिली ते म्हणाले की आमचे सरकार कोणतीहि योजना बंद पडू देणार नाही जे आश्वासन आमच्या सरकारने दिलेली आहेत ते आश्वासन आमचे सरकार नक्की पूर्ण करणार व त्याप्रमाणे लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर चा हप्ता अधिवेशन संपल्यानंतर महिलांचे खात्यात जमा केला जाईल.

तसेच सरकारने अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा केला जाणार आहे.

हे पण वाचा : या महिलांना मिळणार 9000 हजार रुपये, लगेच पहा तुम्हाला किती मिळणार पैसे

हे काम करा तरच मिळतील योजनेचे पैसे

राज्यांमध्ये अशा अनेक महिला आहेत ज्यांचे अर्ज तर मंजूर आहे परंतु त्यांना या योजनेचा आतापर्यंत एकही हप्ता मिळाला नाही अशा सर्व महिलांसाठी सरकारकडून वारंवार काही निर्देश देण्यात आलेले होते की महिलांनी आपले बँक खाते आधार लिंक करून घ्यावे कारण या योजनेचा पैसा फक्त आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा केला जात आहे.

Ladki Bahin Yojana Instruction
Ladki Bahin Yojana Instruction

परंतु अनेक महिलांचे खाते आधालिंक नसल्यामुळे व काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांना या योजनेचा एकही हप्ता मिळाला नाही करिता अशा सर्व महिलांनी आपल्या बँक शाखेमध्ये जाऊन आपले खातेआधार लिंक करावे व त्याप्रमाणे आपले बँक खाते बंद पडलेले असेल तर त्याला चालू करून घ्यावे अन्यथा त्यांनी पोस्ट बँकेमध्ये जाऊन नवीन खाते काढून घ्यावे जेणेकरून योजनेचे लाभ महिलांच्या खात्यात जमा होण्यास काही अडचणी येणार नाहीत.

1 thought on “Ladki Bahin Yojana Instruction : हे काम करा तरच मिळतील लाडकी बहीण योजनेचे पैसे, सरकारने जारी केले निर्देश”

Leave a Comment