SBI Report On Ladki Bahin Yojana News In Marathi अनेक राज्यांमध्ये निवडणुकीच्या वेळी पक्षाला विजय मिळवून देण्यासाठी सरकारकडून अनेक आश्वासने दिली जातात त्यामध्ये निवडणुकीच्या वेळी थेट आर्थिक लाभ देणाऱ्या योजना जाहीर केल्या जातात. याबाबत भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियानी चिंता व्यक्त केलेली आहे एसबीआय ने स्पष्ट सांगितले की अशा योजनांचा बोजा राज्य सरकारच्या बजेटवर पडतो तर आज आपण या संदर्भात सविस्तर माहिती पुढे पाहणार आहोत.
महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये मागील झालेल्या विधानसभा निवडणुकीत अनेक आश्वासने देण्यात आले त्यामध्ये महिलांना थेट आर्थिक लाभ देण्यासाठी नवीन योजना जाहीर करण्यात आल्या या योजनांमुळे विधानसभा निवडणुकीत पक्षाला मोठा फायदा झाला आणि त्यानंतर सरकारी स्थापन झाले महाराष्ट्रात सुरू केलेली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेमुळे राज्य सरकारवर आर्थिक ताण आला आहे.
याचा परिणाम आगामी बजेटमध्ये दिसू शकतो असा अहवाल एसबीआय ने जाहीर केलेला आहे ही योजना आठ राज्यांमध्ये जाहीर करण्यात आलेली आहे त्याची एकूण किंमत 1.5 लाख कोटी रुपये पेक्षा जास्त आहे ही रक्कम राज्याच्या उत्पन्नाच्या 3-11 टक्के आहे . कर्नाटक राज्यांमध्ये गृहलक्ष्मी योजना राबवली जात आहे या योजनेवर सरकारला वर्षाला 28 हजार 608 कोटी रुपयांचा खर्च लागत आहे.
हा खर्च कर्नाटक राज्याच्या महसुलाच्या 11 टक्के आहे अशाच प्रकारे पश्चिम बंगालमध्ये लक्ष्मी भंडार योजना चालवली जात आहे ज्यावर वार्षिक 14 हजार 400 कोटी रुपयांचा खर्च होत आहे एकूण महसुलीच्या हे प्रमाण सहा टक्के आहे एसबीआयच्या अहवालामध्ये सांगण्यात आलेली आहे की या योजना सरकारला मदत जरी करत असल्या व महिलांना आर्थिक स्वतंत्र बनवत असल्या तरी राज्यांनी त्या जाहीर करण्यापूर्वी वित्तीय तुटीकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
हे पण वाचा : जानेवारीचे 1500 रुपये आले नाही, तात्काळ करा हे काम जमा होतील पैसे.
निवडणुकीपूर्वी लाडकी बहीण योजनेसारख्या योजना जाहीर करण्याचा असाच ट्रेंड कायम राहिला तर भविष्यात त्याचा दबाव केंद्र सरकारवर पण पडू शकतो अशी चिंता स्टेट बँक इंडियाने व्यक्त केली आहे.
नमस्कार मी चंद्रकांत घोडके मागील दहा वर्षापासून सरकारी योजना संदर्भात ब्लॉगिंग व यूट्यूब च्या माध्यमातून माहिती देत आहे, त्यामुळे आपल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना च्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला जे काही माहिती दिली जात आहे ती अभ्यासपूर्वक दिली जात आहे .