Ladki Bahin Yojana New Update : या लाडक्या बहिणींच्या अर्जाची पडताळणी होणार, तयार ठेवा हे 4 कागदपत्रे

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ladki Bahin Yojana New Update News In Marathi : मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट समोर आलेली आहे महाराष्ट्र सरकारकडून या योजनेच्या निकषात न बसणाऱ्या महिलांच्या अर्जाची पडताळणी केली जाणार आहे पुढील काही दिवसांमध्ये अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिका यांच्यामार्फत अर्जाची पडताळणी केली जाणार आहे तर आज आपण या ( Ladki Bahin Yojana New Update ) संदर्भात सविस्तर माहिती पुढे पाहणार आहोत.

सरकार या महिलांना करणार अपात्र

चार चाकी वाहन असलेल्या कुटुंबातील महिलांना महाराष्ट्र सरकार लाडकी बहीण योजनेतून वगळण्याचा निर्णय घेतलेला आहे मीडिया रिपोर्टच्या माहितीनुसार पुणे जिल्ह्यात तब्बल 21 लाख 11 हजार 991 महिलांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज केला होता मात्र शासनाने चार चाकी वाहन असलेल्या कुटुंबातील महिलांची अर्ज अपात्र घोषित केले आहे

महिला व बालकल्याण विभागाचे सचिव डॉक्टर अनुप कुमार यादव यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे बैठक घेतली असता राज्यभरातील अधिकाऱ्यांना यासंदर्भात सूचना दिलेल्या आहेत परिवहन विभागाच्या मदतीने वाहनधारकांची यादी तयार करून जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात आलेली आहे.

तपासणीशिवाय अनेक महिलांचे अर्ज झाले होते मंजूर

विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने या योजनेचे कोणत्याही तपासणीशिवाय अनेक महिलांचे अर्ज मंजूर केले होते मात्र आता सरकारकडून पात्रता निकष तपासले जाणार आहे त्यामध्ये चार चाकी वाहन असणाऱ्या व निकषात न बसणाऱ्या कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही पुणे जिल्ह्यामध्ये अजूनही 4800 अर्जाची छाननी बाकी आहे आणि त्यासाठी 4 फरवरी 2025 अखेरची मुदत दिलेली होती.

अर्ज पडताळणीची अंमलबजावणी कशी करणार

शासनाच्या आदेशानुसार अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका आणि बाल विकास प्रकल्प अधिकारी हे महिलांच्या घरी जाऊन अर्जाची पडताळणी करतील अशा अर्जाची नावे विभागाकडे पाठवले जातील. जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सांगितले की शासनाने दिलेल्या निदर्शनाचे आम्ही तात्काळ अंमलबजावणी करत आहोत.

हे पण वाचा : लाडकी बहीण योजनेचा 8 वा हप्ता कधी मिळणार ? या वेळी खात्यात ₹2,100 जमा होतील का ?

Ladki Bahin Yojana New Update
Ladki Bahin Yojana New Update

लाडकी बहीण योजनेचे निकष काय आहे

महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेचे काही निकष ठेवलेले आहेत त्याची माहिती खालील प्रमाणे आहे.

  • लाभार्थी महिलांची वय 18 ते 65 वयोगटातील असावे
  • कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे
  • कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीत नसावा
  • कुटुंबातील कोणताही सदस्य आयकर दाता नसावा
  • कुटुंबाच्या कोणताही सदस्याच्या नावावर चार चाकी वाहन नसावी

Leave a Comment