Ladki Bahin Yojana Update : अपात्र महिलांना पण मिळाले कोट्यावधी रुपये, 5 लाख महिलावर सरकारने केली कारवाई

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ladki Bahin Yojana News In Marathi : महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या माध्यमातून आर्थिक दृष्ट्या व गरीब परिवारातील महिलांना महाराष्ट्र सरकार 1500 रुपये महिना देत आहे या योजनेचा लाभ घेऊन महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम होतील व त्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागू नये या उद्देशाने सरकारने या योजना लागू केले आहे

परंतु अनेक महिलांनी या योजनेच्या निकषांचे पालन न करता या योजनेसाठी अर्ज करून त्या महिलानी लाभ घेतलेला आहे अशातच सरकारने काही आकडेवारी जाहीर केली आहे त्यामध्ये कोट्यावधी अपात्र महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे तर आज आपण या संदर्भात सर्व माहिती सविस्तर पुढे पाहणार आहोत.

5 लाख महिला अपात्र

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत पाच लाख महिलांना सरकारने अपात्र घोषित केले आहे त्यामध्ये एक लाख 50 हजार महिलांचे वय 65 वर्षापेक्षा जास्त होते त्याचप्रमाणे एक लाख 60 हजार महिलांच्या कुटुंबाच्या सदस्याच्या नावे चार चाकी वाहन होती व तसेच काही महिला इतर सरकारच्या आर्थिक योजनेच्या लाभार्थी होत्या तसेच दोन लाख तीस हजार महिला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत होत्या त्यामुळे सरकारने अशा सर्व महिलांना अपात्र घोषित केले आहेत.

महाराष्ट्र सरकारला 450 कोटींचा फटका

विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी महाराष्ट्र सरकारने पाच लाख अपात्र महिलांनाही या योजनेअंतर्गत लाभ दिला आहे त्यामुळे महाराष्ट्र सरकारला 450 कोटी रुपयांचा फटका बसलेला आहे परंतु अशा महिलांचे पैसे सरकार परत घेणार नाही अशी माहिती समोर येत आहे.

अर्ज तपासणीपूर्वीच निधी वाटप

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ( Ladki Bahin Yojana ) महाराष्ट्र सरकारकडून डिसेंबर 2024 पर्यंत दोन कोटी 46 लाख महिलांना लाभ मिळाला आहे परंतु जानेवारी 2025 मध्ये अर्जाची फेर पडताळणी केली असता लाभार्थ्यांची संख्या दोन कोटी 41 लाख वर आलेली आहे तर सरकारने आधीच अर्जाची योग्य प्रकारे तपासणी केली असती तर सरकारचे 450 कोटी रुपये वाचले असते.

हे पण वाचा : फेब्रुवारी महिन्यचा 8 वा हाप्ता या दिवशी जमा होणार, आता मिळणार महिलांना ₹2100 रुपये

अपात्र ठरलेल्या महिलांचे निकष

महाराष्ट्र सरकारकडून या योजनेचा लाभ घेण्यासाठी काय निकष ठरवलेले होते त्यामध्ये महिलांचे वय 21 ते 65 वयोगटातील असावी त्याचप्रमाणे महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे, महिलांच्या कुटुंबाच्या नावी चार चाकी वाहन नसावी, महिला इतर शासकीय आर्थिक योजनेची लाभार्थी नसावी, महिलांच्या कुटुंबाचा सदस्य सरकारी नोकरीवर नसावा. अशा प्रकारचे काही निकष सरकारने ठेवलेले आहेत.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana

सरकारचा मोठा निर्णय

महाराष्ट्र सरकारकडून लाडकी बहीण योजने संदर्भात मोठा निर्णय घेण्यात येणार आहे सरकारकडून स्पष्ट केले आहे की ज्या महिलांनी योजनेच्या निकषाचे पालन न करता लाभ घेतलेला आहे अशा महिलांचे सरकार पैसे परत घेणार नाही परंतु अशा महिलांना या योजनेअंतर्गत पुढे लाभ दिला जाणार नाही.

1 thought on “Ladki Bahin Yojana Update : अपात्र महिलांना पण मिळाले कोट्यावधी रुपये, 5 लाख महिलावर सरकारने केली कारवाई”

Leave a Comment