Ladki Bahin Yojana2024 : महाराष्ट्र सरकारकडे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची ऑनलाईन अर्ज पावणे दोन कोटीच्या आसपास आले आहेत या योजनेचा पहिला टप्पा 19 ऑगस्ट 2024 रोजी पात्र महिलांना तीन हजार रुपये वितरित केला जाणार आहे त्याचप्रमाणे राज्य सरकारकडून एक गॅस सिलेंडर ही मोफत देण्याची शक्यता आहे लाडकी बहीण नाराज होणार नाही यांची पूर्णपणे दक्षता घेऊन तालुकास्तरीय समिती अवघ्या पाच ते सहा दिवसात सव्वा दोन कोटी अर्ज पडताळणी केली आहे.
मुख्यमंत्री यांच्या उपस्थित होणार कार्यक्रम
19 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन असून त्याच दिवशी राज्यातील पात्र महिलांना त्यांच्या बँक खात्यात तीन हजार रुपये पाठवले जाणार आहे आणि त्यानंतर अर्जाची त्रुटी पूर्तता केलेल्या महिलांच्या खात्यात पुढील होणाऱ्या विधानसभा निवडणुका लागण्यापूर्वी त्यांच्या बँक खात्यात पैसे पाठवले जाणार आहे
मुख्यमंत्री अन्नपूर्णे योजना च्या लाभार्थी महिलांना देखील त्याचवेळी सरकारकडून एक गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहे यासंदर्भात मुंबईत मोठा जंगी कार्यक्रम घेण्याची नियोजन सुरू असून त्यासाठी कोटीवधी रुपयाचा खर्च अपेक्षित असल्याचे माहिती मिळाली आहे.
योजनेसाठी 4 हजार कोटी दरवर्षी खर्च होणार
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थी महिलांना व तसेच उज्वला योजनेतील अंदाजे अडीच कोटी महिलांना दरवर्षी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतून 3 गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहे त्यासाठी सरकारकडून प्रत्येकी गॅस सेंटरसाठी 530 रुपये देणार आहे या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी राज्य शासनाच्या तिजोरी मधून दरवर्षी 3975 कोटी रुपये द्यावे लागणार आहेत.
हे पण वाचा : Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजने संदर्भात उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय पहा संपूर्ण माहिती
नमस्कार मी चंद्रकांत घोडके मागील दहा वर्षापासून सरकारी योजना संदर्भात ब्लॉगिंग व यूट्यूब च्या माध्यमातून माहिती देत आहे, त्यामुळे आपल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना च्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला जे काही माहिती दिली जात आहे ती अभ्यासपूर्वक दिली जात आहे .
1 thought on “Ladki Bahin Yojana 2024 : लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी, महिलांना 3000 हजार रुपये आणि गॅस सिलेंडर फ्री, पहा संपूर्ण माहिती”