Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजने संदर्भात उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय पहा संपूर्ण माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र सरकारकडून 28 जून 2024 रोजी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आलेली आहे या योजनेला राज्यभरातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळताना दिसत आहे या योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरीब परिवारातील महिलांना सरकार 1500 रुपये प्रति महिना देणार आहे राज्य सरकारकडे या योजनेच्या ऑनलाईन अर्ज 2 कोटीच्या जवळपास प्राप्त झाले आहे.

मुख्यमंत्री माजी Ladki Bahin Yojana राज्यभरात लागू झाल्यापासून या योजने संदर्भात उच्च न्यायालयामध्ये काही याचिका दाखल करण्यात आली आहे त्यात त्यांनी या योजनेमुळे सरकारी तिजोरीवर मोठ्या प्रमाणात भार पडणार व त्याचप्रमाणे करदात्यांच्या पैशांचा गैरवापर होत असल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला होता ही योजना रद्द करावी अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती. याच याचिकेवर आज मुख्य न्या उपाध्यक्ष आणि न्या अमित बोरकर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

लाडकी बहीण योजना संदर्भात उच्च न्यायालयाचे निर्णय

High Court On Ladki Bahin Yojana
High Court On Ladki Bahin Yojana

मुख्यमंत्री माजी Ladki Bahin Yojana महिलांसाठी कल्याणकारी योजना असून अशा प्रकारची योजना राबवणे हा सरकारचा एक धोरणात्मक निर्णय आहे या योजनेसाठी अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यात आलेली आहे त्यामुळे न्यायालयाला या योजने मध्ये हस्तक्षेप करता येणार नाही असे स्पष्ट करत मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. देवेंद्रकुमार उपाध्यक्ष यांच्या खंडपीठाने या योजने संदर्भात आव्हान देणारी याचिका सोमवारी फेटाळली आहे.

राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेला अक्षेप घेत नवी मुंबईतील चार्टड अकाउंटंट नाविद मुल्ला यांनी एडवोकेट ओवेस पेचकर यांच्याद्वारे मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती या निर्णयामुळे राज्य सरकारला व राज्यातील महिलांना एक मोठा दिलासा मिळाला आहे.

हे पणवाचा : Ladki Bahin Yojana Online Apply Official Website Portal ,असे करा ऑनलाईन अर्ज, अगदी सोप्या पद्धतीने, संपूर्ण अर्ज प्रक्रिया

1 thought on “Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजने संदर्भात उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय पहा संपूर्ण माहिती”

Leave a Comment