Ladki Bahin Good News In Marathi : सध्या महाराष्ट्र मध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा बोलबाला आहे या योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरीब परिवारातील महिलांना महाराष्ट्र सरकारकडून दरमहा 1500 रुपये दिले जात आहे आणि या योजनेअंतर्गत आतापर्यंत तब्बल दोन कोटी, 34 लाख महिलांना पाच हप्त्याचे पैसे साडेसात हजार रुपये देण्यात आले आहे या योजनेमुळे राज्यातील महिलांना खूप मोठा दिलासा मिळालेला आहे.
अशातच महिलांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे आता महिलांना थेट 25000 हजार रुपये मिळणार आहे अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे व त्याचप्रमाणे अनेक मोठ्या घोषणा सरकारकडून करण्यात आलेल्या आहेत तर आज आपण या संदर्भात संपूर्ण माहिती पुढे पाहणार आहोत.
Table of Contents
राज्यातील शेतकरी बांधवांची होणार कर्जमाफी
महायुती सरकारचा कोल्हापूर येथील प्रचार सभेत वचननामा जाहीर करण्यात आलेला आहे या वचनामध्ये राज्यातील शेतकरी बांधवांची कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान योजनेतून वर्षाला 12000 हजार मध्ये वाढ करून 15000 रुपये दिले जातील अशी घोषणा करण्यात आली.
आता महिलांना मिळणार 25000 हजार रुपये
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेबाबत राज्यातील महिलांना खूप मोठे आश्वासन दिलेले आहे आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना 1500 रुपये ऐवजी 2100 रुपये म्हणजे वर्षाला 25000 हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे कोल्हापूर मधील महायुतीच्या प्रचार सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
वृद्ध पेन्शन धारकांना मिळणार 2100 रुपये
राज्यातील वृद्धपेशनधारकांना महाराष्ट्र सरकारकडून 1500 रुपये दिले जात आहे आता यामध्ये आम्ही वाढ करून 2100 रुपये देण्याचे वचन महायुतीच्या सरकारने त्यांच्या जाहीरनाम्यात केलेले आहेत, त्याचप्रमाणे आशा सेविकांना आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांना 15000 रुपये सुरक्षा कवच व त्याचप्रमाणे महिन्याला 15000 हजार रुपये वेतन देण्याची वचन या जाहीरनाम्यात करण्यात आलेले आहे अशाच प्रकारच्या अनेक घोषणा महायुतीच्या सरकारच्या वचनाम्यात करण्यात आले आहे.
नमस्कार मी चंद्रकांत घोडके मागील दहा वर्षापासून सरकारी योजना संदर्भात ब्लॉगिंग व यूट्यूब च्या माध्यमातून माहिती देत आहे, त्यामुळे आपल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना च्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला जे काही माहिती दिली जात आहे ती अभ्यासपूर्वक दिली जात आहे .
1 thought on “Ladki Bahin Good News : लाडक्या बहिणींना मिळणार आता 25000 हजार रुपये, मुख्यमंत्री यांनी केली घोषणा, पहा संपूर्ण माहिती”