Ladki Bahin Yojana Maharashtra News In Marathi : मुख्यमंत्री माजी लाडकी बहिण योजनेच्या पात्र महिलांसाठी मोठी बातमी समोर येत आहे मीडिया रिपोर्टच्या माहितीनुसार धुळे जिल्ह्यातले एका महिलेचे 7500 हजार रुपये सरकारने परत घेतले आहे महाराष्ट्र सरकारकडून अर्जाची तपासणी सुरू करण्यात आलेली आहे आणि अनेक महिलांवर अशा प्रकारे कारवाई करण्याची शक्यता आहे तर आज आपण या संदर्भात सविस्तर माहिती पुढे पाहू.
लाडकी बहीण योजनेची थोडक्यात माहिती
महाराष्ट्र राज्यातील सर्वात चर्चेत असलेली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेच्या माध्यमातून जुलै ते ऑगस्ट डिसेंबर पर्यंत पैसे 2 कोटी 47 लाख महिलांना दिलेले आहेत यामुळे ही योजना राज्यभरामध्ये चर्चेचा विषय ठरलेले आहे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून 28 जून 2024 रोजी या योजनेची घोषणा करण्यात आली होती राज्यातील अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या महिलांना या योजनेअंतर्गत 1500 महिना दिला जात आहे.
अशातच आता या योजनेबद्दल सर्वात मोठी अपडेट समोर येत आहे ज्या महिलांनी शासनाच्या निकषांचे उल्लंघन करून अर्ज सादर केले होते व त्यांचे अर्ज मंजूर झालेली आहे तर अशा महिलावर सरकार कारवाईचे पाऊल उचलत असल्याचे समोर येत आहे धुळे जिल्ह्यातील एका लाभार्थींना पाच हप्त्याचे पैसे साडेसात हजार रुपये मिळाले होते तर त्या महिलांनी साडेसात हजार रुपये सरकारच्या तिजोरीमध्ये पुन्हा जमा केलेले आहे.
5 महिन्याचे 7500 रूपये सरकारने घेतले परत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेचा आढावा घेतल्यानंतर मंजूर अर्जाची पुन्हा पडताळणी केली जाईल अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेली आहे अशातच धुळे जिल्ह्यातील एका नकाने गावातील महिलांनी या योजनेचा डबल लाभ घेतल्याचे समोर आले होते ही बाब सदर अर्जाच्या फेर पडताळणीमध्ये समोर आले त्यामुळे त्या महिलेकडून साडेसात हजार रुपये सरकारने परत घेतलेली आहे.
हे पण वाचा : या 5 प्रकारच्या लाखो लाडक्या बहिणीं होणार अपात्र, लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची पुन्हा पडताळणी
नमस्कार मी चंद्रकांत घोडके मागील दहा वर्षापासून सरकारी योजना संदर्भात ब्लॉगिंग व यूट्यूब च्या माध्यमातून माहिती देत आहे, त्यामुळे आपल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना च्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला जे काही माहिती दिली जात आहे ती अभ्यासपूर्वक दिली जात आहे .
2 thoughts on “Ladki Bahin Yojana Maharashtra : मोठी बातमी लाडक्या बहिणींवर कारवाई 5 महिन्याचे 7500 रूपये सरकारने घेतले परत”