Ladki Bahin Yojana News In Marathi : महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांसाठी मागील झालेल्या अर्थसंकल्पात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ची घोषणा करण्यात आली त्यानंतर सरकारने 1 जुलैपासून या योजनेची ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली त्यानंतर राज्यभरातून महिलांचा योजनेला मोठा प्रतिसाद दिसायला मिळाला सरकारकडे या योजनेची तीन कोटीच्या जवळपास अर्ज प्राप्त झाले.
अर्ज प्राप्त झाल्यानंतर सरकारकडून तालुकास्तरीय समितीमार्फत अर्ज पडताळणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आणि पात्र महिलांना या योजनेअंतर्गत लाभ देण्यास सुरुवात झाली सरकारकडून 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत जुलै ते नोव्हेंबर पर्यंतचे पैसे अंदाजे 2 कोटी 34 लाख महिलांच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहेत त्यानंतर राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली त्यामुळे या योजनेला तात्पुरत्या स्वरूपात स्थगिती देण्यात आली.
याच योजनेच्या मदतीने महायुती सरकारला मोठ्या प्रमाणात विधानसभा निवडणुकीमध्ये यश प्राप्त झाले आणि पुन्हा एकदा राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन झाले त्यानंतर महिला आता या योजनेच्या सहाव्या हप्त्याची वाट पाहत होती अशातच महिलांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे महाराष्ट्र सरकारकडून या योजनेचे डिसेंबर महिन्याचे पैसे जमा करण्यास सुरुवात झालेली आहे या संदर्भात सविस्तर माहिती पुढे पाहणार आहोत.
या महिलांच्या खात्यात 9000 हजार रुपये जमा
राज्यामध्ये अशा अनेक महिला आहेत ज्यांचे अर्ज जुलै महिन्यामध्येच मंजूर झाले परंतु बँक खाते आधार लिंक नसल्यामुळे त्यांना या योजनेचा एकही हप्ता आतापर्यंत मिळालेला नाही त्याचप्रमाणे अनेक महिलांनी ऑक्टोबर महिन्यामध्ये अंगणवाडी केंद्र मार्फत अर्ज केले होते व त्यांचे अर्ज निवडणूक झाल्यानंतर मंजूर करण्यात आले
हे पण वाचा : आनंदाची बातमी लाडक्या बहिणीच्या खात्यात 6 वा हप्ता जमा, पहा तुम्हाला किती मिळणार पैसे
तर अशा सर्व महिलांच्या खात्यात सरकारकडून जुलै ते डिसेंबर पर्यंतच्या सर्व हप्त्याचे पैसे 9000 हजार रुपये जमा करण्यात आलेले आहे त्याचप्रमाणे ज्या महिलांना ऑक्टोंबर महिन्यांमध्ये 7500 हजार रुपये मिळाले होते अशा महिलांना सरकारकडून 1500 रुपये जमा करण्यात आलेले आहेत.
6 वा हप्ता जमा झालेल्या महिलांची यादी जाहीर
महाराष्ट्र सरकारकडून लाडकी बहीण योजनेचा ( Ladki Bahin Yojana ) सहावा हप्ता वितरण प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे ही प्रक्रिया सरकारने 24 डिसेंबर 2024 पासून सुरू केली आहे त्यामुळे महिलांच्या खात्यात या योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर तुम्हाला सरकारकडून योजनेअंतर्गत किती पैसे पाठवले आहे हे तपासाचा असेल तर त्यासाठी तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही पाहू शकता.
या तारखेपर्यंत जमा होणार सर्व महिलांच्या खात्यात पैसे
महाराष्ट्र सरकारकडून लाडकी बहीण योजनेच्या ( Ladki Bahin Yojana ) पात्र महिलांच्या खात्यात सहावा हप्ता जमा करण्यात ची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार 24 डिसेंबर 2024 ते २७ डिसेंबर 2024 या कालावधीमध्ये महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जात आहे त्यामध्ये एक कोटी पेक्षा अधिक महिलांची खाते आजपर्यंत जमा झालेले आहेत त्यामुळे ज्या महिलांच्या खात्यात अजून पैसे जमा झाले नाहीत त्यांनी पुन्हा एक ते दोन दिवस वाट पाहावे.
नमस्कार मी चंद्रकांत घोडके मागील दहा वर्षापासून सरकारी योजना संदर्भात ब्लॉगिंग व यूट्यूब च्या माध्यमातून माहिती देत आहे, त्यामुळे आपल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना च्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला जे काही माहिती दिली जात आहे ती अभ्यासपूर्वक दिली जात आहे .