Ladki Bahin Yojana : डिसेंबर चा हप्ता या दिवशी जमा होणार, पण किती मिळणार पैसे ? पहा संपूर्ण माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ladki Bahin Yojana News In Marathi : महाराष्ट्र राज्यामध्ये लोकप्रिय मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेला या योजनेच्या मदतीने महायुती सरकारला विधानसभा निवडणुकीमध्ये मोठा फायदा झाला आहे आणि राज्यात पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुती सरकार स्थापन झाले.

परंतु महायुती सरकारकडून विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आश्वासन देण्यात आले होते की जर महायुती सरकार राज्यात पुन्हा सत्तेत आल्यास या योजनेअंतर्गत पंधराशे रुपये हप्ता एवजी 2100 रुपये हप्ता देऊ पण सरकार स्थापन होऊन दोन आठवडे होत आहेत तरी पण या योजनेअंतर्गत महिलांना या योजनेचा सहावा हप्ता देण्यात आलेला नाही.

अशातच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज हिवाळी अधिवेशनामध्ये सभागृहात बोलताना लाडकी बहीण योजने संदर्भात त्यांनी खूप मोठी घोषणा केलेली आहे त्यामध्ये त्यांनी योजनेचा सहावा हप्ता कधी जमा होणार यासंदर्भात माहिती दिली व त्याचप्रमाणे सहावा हप्ता महिलांना किती मिळणार असा प्रश्न पण महिलांना पडलेला आहे तर आज आपण या संदर्भात सविस्तर माहिती पुढे पाहणार आहोत.

योजनेसाठी 1400 कोटी रुपयांची तरतूद

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या मदतीने महायुती सरकार राज्यात पुन्हा स्थापन झाली आणि अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी लाडकी बहीण योजनेसाठी मोठी घोषणा करण्यात आली यासंदर्भात माहिती मिळाली असता महाराष्ट्र सरकारकडून हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana

या दिवशी जमा होणार डिसेंबर चा हप्ता

राज्यातील दोन कोटी 34 लाख महिलांचे लक्ष या योजनेच्या डिसेंबर महिन्याच्या हप्त्याकडे लागलेलं आहे राज्यांमध्ये लाडक्या बहिणीच्या आशीर्वादाने महायुती सरकार स्थापन तर झाले परंतु दोन आठवडे होऊन सुद्धा लाडकी बहीण योजनेअंतर्गत डिसेंबर महिन्याचा हप्ता सरकारकडून महिलांच्या खात्यात जमा केला गेलेला नाही.

अशातच महिलांसाठी आता आनंदाची बातमी समोर येत आहे आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान सभागृहांमध्ये लाडकी बहीण योजने संदर्भात माहिती देताना ते म्हणाले कि लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता आम्ही अधिवेशन संपल्यानंतर महिलांच्या खात्यात जमा करू व आम्ही कोणतीहि योजना बंद करणार नाही जे आम्ही आश्वासन दिलेले आहेत ते सर्व आश्वासन आम्ही पूर्ण करू.

त्यामुळे महिलांनाच्या खात्यात पुढील काही दिवसांमध्ये या योजनेचा सहावा हप्ता सरकारकडून जमा केला जाणार हे स्पष्ट झाले आहे .

हे पण वाचा : या योजनेतून महिलांना मिळणार 7000 हजार रुपये महिना , अर्ज प्रक्रिया सुरू लगेच करा अशा प्रकारे अर्ज सादर

डिसेंबरच्या हप्त्यात किती पैसे मिळणार

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज हिवाळी अधिवेशनादरम्यान सभागृहात बोलताना ते म्हणाले की आम्ही लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता अधिवेशन संपल्यानंतर महिलांच्या खात्यात जमा करू पण महिलांना या योजनेअंतर्गत किती हप्ता मिळणार असा प्रश्न महिलांकडून उपस्थित केला जात आहे

यासंदर्भात माहिती मिळाली असता महाराष्ट्र सरकारकडून लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2100 रुपये महिना देण्यासंदर्भात सध्या तरी कुठलाच निर्णय घेण्यात आलेला नाही त्यामुळे सध्या तरी डिसेंबर महिन्यात महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा केले जाऊ शकतो.

Leave a Comment