Ladki Bahin Yojana Eligibility 2025 : या 5 प्रकारच्या लाखो लाडक्या बहिणीं होणार अपात्र, लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची पुन्हा पडताळणी

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ladki Bahin Yojana Eligibility News In Marathi : राज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुती सरकार स्थापन झाले त्यानंतर नव्या सरकारने लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा केला काही महिलांच्या खात्यात सहा महिन्याचे पैसे तर काही महिलांच्या खात्यात डिसेंबर महिन्याचे पैसे जमा करण्यात आले परंतु आशातच आता लाडकी बहीण योजनेच्या लाखो महिला अपात्र ठरण्याची शक्यता आहे.

कोणत्याही लाभार्थी महिला संदर्भात विभागाकडे तक्रार प्राप्त झाली तर त्या महिलांच्या अर्ज पुन्हा पडताळणी केली जाईल त्यानुसार निकषामबाह्य अर्ज भरल्या महिलांना अपात्र करण्यात येणार अशी माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली तर त्यामध्ये कोणकोणत्या महिला अपात्र होणार याबाबत ( Ladki Bahin Yojana Eligibility 2025 ) सर्व माहिती आपण पुढे पाहणार आहोत.

योजनेचा लाभ किती महिलांना मिळाला

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेचा लाभ जुलै महिन्यापासून महिलांना मिळण्यास सुरुवात झाली सरकारकडून 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत 2 कोटी 34 लाख महिलांना लाभ देण्यात आला सरकारकडे 2 कोटी 63 लाख अर्ज प्राप्त झाले होते त्यापैकी 2 कोटी 47 लाख महिला पात्र ठरलेले आहेत परंतु 12 लाख 87 हजार बहिणीचे बँक खाते आधारशी लिंक नसल्यामुळे त्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही.

त्याचप्रमाणे सरकारने डिसेंबर महिन्याचा लाभ देण्यासाठी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली राज्याचे मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर 24 डिसेंबर 2024 पासून डिसेंबर महिन्याचा लाभ महिलांच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात झाली.

या महिलांच्या खात्यात जमा झाले 9000 हजार रुपये

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा अर्ज मंजूर असून सुद्धा त्यांना या योजनेचा एकही हप्ता मिळाला नव्हता अशा 12 लाख 47 हजार लाडक्या बहिणींना सहा महिन्याचे एकूण नऊ हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेले आहेत.

हे पण वाचा : आनंदाची बातमी 2100 रुपये ह्या दिवशी जमा होणार, तारीख ठरली नवीन वर्षात सरकार देणार मोठी भेट

या 5 प्रकारच्या लाडक्या बहिणींना होणार

महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना लाडकी बहीण योजने संदर्भात महत्त्वाची माहिती दिली लाडकी बहीण योजने संदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यावर त्यांनी उत्तर देत म्हणाल्या लाडकी बहीण योजनेच्या मंजूर अर्जाची सरसकट छाननी केली जाणार नाही जर लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांच्या अर्जासंबंधीत विभागाकडे तक्रार आल्यास.

Ladki Bahin Yojana Eligibility 2025
Ladki Bahin Yojana Eligibility 2025

तर अशा अर्जाची पुन्हा पडताळणी केली जाणार त्यामध्ये ज्या महिलांची उत्पन्न अडीच लाख अपेक्षा जास्त आहे अशा महिलांना अपात्र करण्यात येणार त्याचप्रमाणे ज्या महिलांच्या कुटुंबाकडे चार चाकी वाहन आहे अशा महिलांना पण अपात्र करण्यात येणार व तसेच ज्या महिलांचे इतर राज्यांमध्ये विवाह झालेला आहे अशा महिलांना पण अपात्र ठरविण्यात येईल व ज्या महिलांच्या बँक पासबुक मध्ये व आधारच्या नावांमध्ये फरक आहे अशा महिलांना पण योजनेतून वगळण्यात येणार.

Leave a Comment