Ladki Bahin Yojana New Registration Start : महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू आहे या योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांना 1500 रुपये दर महिन्याला देण्यात येणार आहे या योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे या योजनेला राज्यभरात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळताना दिसत आहे परंतु काही दिवसापासून ॲप व योजनेची अधिकृत वेबसाईट व्यवस्थितपणे काम नाही आहे त्यामुळे महिलांना अर्ज करण्यासाठी अडचण निर्माण होत आहे .
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे अधिकृत वेबसाईट व ॲप हे काही तांत्रिक अडचणीमुळे व्यवस्थितपणे काम करत नव्हते परंतु 7 ऑगस्ट 2024 पासून Ladki Bahin Yojana Website सुरू करण्यात आलेली आहे आता राज्यभरातील महिला या योजनेसाठी शासनाच्या अधिकृत वेबसाईट मार्फत ऑनलाईन अर्ज करू शकतात तर आज आपण , Ladki Bahin Yojana Online Apply, Ladki Bahin Yojana New Registration, Ladki Bahin Maharashtra Portal Link, Ladki Bahin Yojana Online Apply Process अशा प्रकारची संपूर्ण माहिती प्राप्त करूया
About Ladki Bahin Maharashtra Portal Link
महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अर्ज प्रक्रियेसाठी अधिकृत वेबसाईट 1 ऑगस्ट 2024 रोजी लॉन्च केली आहे आता राज्यातील महिला या योजनेचा लाभ घेण्यासाठी या योजनेच्या अधिकृत वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज करू शकतात
पण आता वेबसाईटचे माध्यमातून या योजनेचा ऑनलाईन अर्ज सादर करताना अर्जदार महिलांच्या आधार कार्ड ला मोबाईल नंबर जोडून असणे अनिवार्य आहे जर अर्जदार महिलांच्या आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक नसेल ती महिला या योजनेसाठी आपले ऑनलाईन अर्ज सादर करू शकणार नाही आणि जर महिलांच्या आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक असेल तर या वेबसाईटचे माध्यमातून अर्ज करण्याची प्रक्रिया अत्यंत सोप्या पद्धतीने केली आहे.
Ladki Bahin Yojana Document List
- आधार कार्ड
- अधिवास प्रमाणपत्र, राशन कार्ड 15 वर्षे पूर्वीचे, मतदान कार्ड 15 वर्षे पूर्वीचे, शाळा सोडण्याचा दाखला, जन्म दाखला यापैकी कोणतेही एक
- उत्पन्नाचा दाखला, किंवा पिवळ्या व केशरी रंगाचे राशन कार्ड
- अर्जदार महिलेचा फोटो
- हमीपत्र
- आधार लिंक मोबाईल नंबर
- बँक पासबुक आधार लिंक असलेले
हे पण वाचा : Ladki Bahin Yojana 2nd Installment : सर्वात मोठी बातमी, महिलांना मिळणार ₹4500 हजार रुपये, पहा संपूर्ण माहिती
Ladki Bahin Yojana Eligibility
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करणारी महिला ही महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे आणि त्याच प्रमाणे महिलेची वय हे 21 ते 65 वर्ष आत असावे.
Ladki Bahin Yojana New Registration Start
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची ॲप व अधिकृत वेबसाईट हे व्यवस्थितपणे काही दिवसापासून काम करत नव्हते परंतु आमच्या टीम कडून 7 ऑगस्ट 2024 रोजी योजनेच्या अधिकृत वेबसाईटने ऑनलाईन अर्ज सादर केले आहेत त्यामुळे या योजनेची वेबसाईट व्यवस्थितपणे काम करत आहे जर आपलेपण या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करणे बाकी आहे तर खाली दिलेल्या स्टेपला फॉलो करून सर्वात पहिली तुम्ही युजर आयडी पासवर्ड तयार करून घ्या.
- नवीन यूजर आयडी पासवर्ड तयार करण्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल .
- वेबसाईटचा होम पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला होम पेजवर अर्जदार लॉगिन हे ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करून घ्यावे .
- आता तुम्हाला यूजर आयडी पासवर्ड तयार करण्यासाठी Create Account या ऑप्शन वर क्लिक करावे .
- तुमच्यासमोर New Registration फॉर्म ओपन होईल त्यामध्ये मागितलेले सर्व माहिती व्यवस्थितपणे भरून घ्यावी
- सर्व माहिती अचूक प्रमाणे भरल्यानंतर कॅपच्या फील करून Signup या ऑप्शन वर क्लिक करावे .
- त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येणार ओटीपी टाकून व्हेरिफाय करून घ्या .
अशा प्रकारे तुमचे मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेच्या वेबसाईटवर युजर आयडी पासवर्ड तयार होईल
Ladki Bahin Yojana Online Apply Process
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी अधिकृत वेबसाईट मार्फत अर्ज करण्याची प्रक्रिया खालील प्रमाणे आहे
- वेबसाईटची युजर आयडी पासवर्ड क्रिएट केल्यानंतर तुमच्यासमोर लॉगिन पेज ओपन होईल .
- आता तुम्ही तयार केलेली यूजर आयडी पासवर्ड इंटर करून लॉगिन करून घ्यावी .
- लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर Application of Mukhyamantri – Majhi Ladki Bahin Yojana ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करून घ्यावे .
- तुमच्यासमोर एक नवीन फॉर्म ओपन होईल त्यामध्ये महिलेचा आधार नंबर टाकून घ्यावे आणि ओटीपी सेंड करावा
- अर्जदार महिलांच्याआधार लिंक मोबाईल नंबर वर ओटीपी जाणार तो ओटीपी टाकून व्हेरिफाय करून घ्यावे
- ही प्रक्रिया झाल्यानंतर तुमच्यासमोर योजनेचा अर्ज फॉर्म ओपन होईल त्यामध्ये काही प्रमाणात माहिती आधार प्रमाणे भरली असेल
- अर्जामध्ये मागितलेले सर्व माहिती अचूक प्रमाणे भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करून घ्यावी
- जर अर्जामध्ये काही माहिती भरणे बाकी असल्यास Save As Draft वर क्लिक करून घ्यावे.
- अन्यथा तुम्हाला Save Information या ऑप्शन वर क्लिक करायचा आहे
- तुमच्यासमोर अर्जाचा Registration Preview पेज ओपन होईल तुम्ही भरलेली सर्व माहिती
- व्यवस्थितपणे तपासून घ्यावी
- त्यानंतर खाली दिलेल्या कॅपच्या फील करून सबमिट या बटनावर क्लिक करून द्यावे.
अशा प्रकारे तुम्ही सोप्या पद्धतीने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज सादर करू शकता .
हे पण वाचा : रद्द झालेले अर्ज असे करा सादर, अर्ज मंजूर होणार फक्त 5 मिनिटात, पहा संपूर्ण माहिती
Ladki Bahin Yojana Online Apply Important Link
Ladki bahin Yojana Important Link
Ladki Bahini Yojana Online Apply Link | Click Here |
Ladki Bahin Online Aadhar Link | Click Here |
Ladki Bahin Aadhar Link Check | Click Here |
Ladki Bahin Yojana Approved List | Click Here |
Ladki Bahin Yojana 2nd InstallmentCheck | Click Here |
Ladki Bahin Yojana Balance Check | Click Here |
नमस्कार मी चंद्रकांत घोडके मागील दहा वर्षापासून सरकारी योजना संदर्भात ब्लॉगिंग व यूट्यूब च्या माध्यमातून माहिती देत आहे, त्यामुळे आपल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना च्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला जे काही माहिती दिली जात आहे ती अभ्यासपूर्वक दिली जात आहे .
2 thoughts on “Ladki Bahin Yojana New Registration Start , Online Apply, Ladki Bahin Maharashtra Portal Link https://ladakibahin.maharashtra.gov.in”