Ladki Bahin Yojana New Update News In Marathi : मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभ घेत असलेल्या अपात्र महिलांसाठी मोठी बातमी समोर येत आहे महाराष्ट्र सरकारकडून लवकरच या योजनेचा सातवा हप्ता अपात्र आणि पात्र महिलांच्या खात्यात जमा केला जाणार आहे.
महाराष्ट्र सरकारची सर्वात महत्वकांक्षी योजना ज्या योजनेने विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला मोठे यश मिळवून दिले या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार आर्थिक दुर्बळ घटकातील गरीब महिलांना 1500 रुपये महिना देत आहे आतापर्यंत सरकारने या योजनेअंतर्गत जानेवारी ते डिसेंबर महिन्याचे पैसे 2 कोटी 47 लाख महिलांच्या खात्यात जमा केलेले आहेत आता सरकार लवकरच या योजनेचा सातवा हप्ता जमा करणार आहे.
परंतु मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ अनेक अपात्र महिलांनी घेतलेला आहे तर अपात्र महिलांना या योजनेचा सातवा हप्ता मिळणार का ? असा प्रश्न निर्माण झालेला आहे यासंदर्भात महिला व बालविकास मंत्री अतिती तटकरे यांनी महत्त्वाची माहिती ( Ladki Bahin Yojana New Update ) दिलेली आहे ती आपण सविस्तर पुढे पाहणार आहोत.
Table of Contents
मंत्री आदिती तटकरे यांनी दिली महत्वाची माहिती
महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजने संदर्भात महत्वाची माहिती दिली आहे ज्या महिला या योजनेच्या निकषांमध्ये बसत नाहीत परंतु त्या महिला या योजनेचा लाभ घेत आहेत अशा काही महिलांनी स्वतःहून योजनेचे पैसे परत करण्यात सुरुवात केली आहे परंतु सरकारने दिलेले पैसे महिलांकडून परत घेणार असा कोणताच विचार सरकारचा नाही परंतु पुढील काळात निकषात बसणाऱ्याच महिलांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी सरकार काही उपयोजना करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले
अपात्र महिलांच्या खात्यात ₹1500 रुपये
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या निकषाचे पालन न करता अनेक महिलांनी अर्ज करून त्या महिला या योजनेचा लाभ घेत आहे तर अशा महिलांना या योजनेचा सातवा हप्ता मिळणार का असा प्रश्न निर्माण झालेला आहे कारण महायुतीच्या अनेक नेतेमंडळी कडून या योजने संदर्भात माहिती देताना ते म्हणाले की ज्या महिला या योजनेच्या निकषात बसणार नाहीत अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही
यासंदर्भात माहिती मिळाली असता महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी पत्रकार माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या की सरकारने सरसकट अर्जाची पडताळणी करण्याचा कोणताच निर्णय घेतलेला नाही परंतु ज्या महिलांच्या तक्रारी विभागाकडे येणारअशा अर्जाची फेरफडताळणी विभाग कडून केली जाणार व त्या महिला या योजनेच्या निकषात बसत नसतील तर त्या महिलांना या योजनेतून बाहेर करण्यात येणार.
परंतु ज्या महिलांच्या तक्रारी विभागाकडे जाणार नाहीत व त्याचप्रमाणे जोपर्यंत सरकार लाडकी बहीण योजनेच्या मंजूर अर्जाची सरसगड पडताळणी करणार नाही तोपर्यंत अपात्र महिलांना या योजनेचा लाभ मिळत राहणार असे स्पष्ट दिसत आहे.
हे पण वाचा : लाडकी बहीण योजनेसाठी अशा प्रकारे करा अर्ज, पुन्हा संधी मिळणार नाही
जानेवारीचे ₹1500 रुपये या दिवशी जमा होणार
महाराष्ट्र सरकारकडून डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या हप्त्यात लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता 2 कोटी 47 लाख महिलांच्या खात्यात जमा केला परंतु आता महिला या योजनेच्या सातव्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहे मीडिया रिपोर्टच्या माहितीनुसार सरकारकडून मकर संक्रांतीच्या दिवशी या योजनेचा सातवा हप्ता जमा केला जाणार अशी माहिती समोर येत होती.
परंतु सरकारकडून मकर संक्रांतीच्या दिवशी ह्या योजनेचा सातवा हप्ता जमा करण्यात आलेला नाही तर अशातच महिलांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता 20 जानेवारी 2025 ते 30 जानेवारी 2025 या कालावधीमध्ये महिलांच्या खात्यात जमा केला जाणार आहे.
नमस्कार मी चंद्रकांत घोडके मागील दहा वर्षापासून सरकारी योजना संदर्भात ब्लॉगिंग व यूट्यूब च्या माध्यमातून माहिती देत आहे, त्यामुळे आपल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना च्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला जे काही माहिती दिली जात आहे ती अभ्यासपूर्वक दिली जात आहे .