Ladki Bahin Yojana Update : महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू असलेली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेचा पहिला हप्ता जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा मिळून 3000 रुपये येत्या 17 ऑगस्ट रोजी पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे परंतु 14 ऑगस्ट 2024 रोजी या योजने संदर्भात माहिती मिळाली असता राज्यातील 33 लाख महिलांना या योजनेचा पहिला हप्ता 17 ऑगस्ट रोजी त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार नाही.
तर आज आपण मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या नवीन अपडेट बद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही आपल्या आर्टिकलला शेवटपर्यंत अवश्य वाचा जेणेकरून तुम्ही ह्या योजनेच्या महत्त्वपूर्ण अपडेट पासून वंचित राहणार नाही.
लाडकी बहीण योजनांची थोडक्यात माहिती
महायुतीच्या सरकारने मागील झालेल्या 2024-25 च्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती या योजनेची अंमलबजावणी 28 जून 2024 रोजी करण्यात आली आहे, या योजनेचा लाभ घेण्यासाठी 1 जुलै 2024 पासून अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे आणि त्याच प्रमाणे या योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2014 आहे.
Ladki Bahin Yojana 2024 : लाडकी बहीण योजनेची वेबसाईट झाली सुरु, लवकर करा ONLINE अर्ज सादर
महाराष्ट्र सरकार मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना दर महिन्याला 1500 रुपये देणार आहे राज्यातील महिला या पैशाचा वापर करून आपल्या परिवाराचा सांभाळ करू शकतील व त्यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळेल यासाठी ही योजना लागू करण्यात आलेली आहे.
1 कोटी 2 लाख महिलांना मिळणार पैसे
महाराष्ट्र सरकारकडून येत्या 17 ऑगस्ट 2024 रोजी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा मिळून तीन हजार रुपये 1 कोटी 2 लाख पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे.
27 लाख महिलांचे बँक खाते आधार लिंक नाही
Ladki Bahin Yojana Update :महाराष्ट्र सरकारकडून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनाचे अर्ज पूर्ण क्षमतांनी पडताळणी करून मंजूर करण्यात आले आहे परंतु यासंदर्भात माहिती मिळाली असता 27 लाख अशा महिला आहेत ज्यांचे अर्ज तर मंजूर झालेत आहे, पण त्यांचे बँक खाते आधार लिंक नसल्याकारणाने त्यांना 17 ऑगस्टला पैसे मिळणार नाही.
जर तुम्ही पण या योजनेसाठी अर्ज केला आहे आणि तुमचा पण अर्ज मंजूर झाला आहे तर तुम्ही लवकरात लवकर येत्या दोन दिवसाच्या आत मध्ये तुमचे बँक खाते आधार लिंक करून घ्या. जेणेकरून तुम्हाला या योजनेचा पहिला हप्ता 17 ऑगस्ट रोजी तुमच्या खात्यामध्ये जमा होईल.
उर्वरित महिलांना या दिवशी मिळणार पैसे
Ladki Bahin Yojana Update: मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता 17 ऑगस्ट 2014 रोजी पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे आणि त्याचबरोबर उर्वरित 33 लाख महिलांच्या खात्यामध्ये 17 ऑगस्ट नंतर पुढील दहा दिवसांच्या आत मध्ये त्यांच्या पण खात्यामध्ये पैसा जमा केला जाणार .
महाराष्ट्र राज्याची महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांच्याकडून राज्यातील महिलांना आपले बँक खाते येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये आधार लिंक करण्याचे आव्हान करण्यात आले आहे.
Ladki Bahin Yojana Update
अशाच प्रकारच्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजने संदर्भात माहिती प्राप्त करण्यासाठी तुम्ही आमच्या व्हाट्सअप चॅनलला जॉईन करू शकता जेणेकरून तुम्हाला तात्काळ या योजने संदर्भात माहिती मिळेल.
Majhi Ladki Bahin Yojana Important Link
Ladki Bahin Yojana Official Website Portal Apply Link | Click Here |
re-Apply Ladki Bahin Yojana Reject Form | Click Here |
नमस्कार मी चंद्रकांत घोडके मागील दहा वर्षापासून सरकारी योजना संदर्भात ब्लॉगिंग व यूट्यूब च्या माध्यमातून माहिती देत आहे, त्यामुळे आपल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना च्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला जे काही माहिती दिली जात आहे ती अभ्यासपूर्वक दिली जात आहे .