Ladki Bahin Yojana Update News In Marathi : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सुरू केलेली लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत आर्थिक दृष्ट्या व गरीब परिवारातील महिलांना पंधराशे रुपये दर महिन्याला दिले जात आहे या योजनेची अर्ज प्रक्रिया अवघ्या काही दिवसा सुरू करून ही योजना योग्य प्रकारे आणि पूर्ण क्षमतेने सरकारने राबवली आहे या योजनेच्या मदतीने महिला आपल्या परिवाराचा सांभाळ करू शकतील आणि त्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागू नये या उद्देशाने ही योजना लागू करण्यात आलेली आहे .
आतापर्यंत सरकारने या योजनेअंतर्गत नोव्हेंबर महिन्यापर्यंत पैसे 2 कोटी 40 लाख पात्र महिलांच्या जमा केलेले आहेत परंतु आता महिला या योजनेच्या सहाव्या हप्त्याच्या प्रत्यक्ष मध्ये आहे अशातच महिलांसाठी आता आनंदाची बातमी समोर येत आहे महाराष्ट्र सरकारकडून 48 तासात योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात सहाव्या हप्ताच्या पैसे जमा करण्याची शक्यता आहे तर आज आपण या संदर्भात संपूर्ण माहिती पुढे पाहणार आहोत.
Table of Contents
महाराष्ट्र ला मिळणार नवे मुख्यंमत्री
महायुती सरकारला लाडक्या बहिणीच्या आशीर्वादाने विधानसभा निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात बहुमत मिळालेले आहे आणि 5 डिसेंबर 2024 रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत शपथविधी सोहळा संपन्न होणार आहे अशातच मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव अंतिम करण्यात आलेले आहे आणि महाराष्ट्र ला आता नवीन मुख्यमंत्री मिळणार आहेत.
48 तासात लाडकी बहीण योजनेचे पैसे होणार जमा
महायुती सरकारने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आणि या योजनेचा लाभ महिलांना देण्यात आला आता महिला या योजनेच्या सहाव्या हप्त्याच्या प्रतीक्षेमध्ये आहे अशातच महिलांसाठी आता आनंदाची बातमी समोर येत आहे 5 डिसेंबर 2024 रोजी राज्यात महायुती सरकार स्थापन होणार आहे आणि पुढील 48 तासांमध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा केला जाऊ शकतो.
हे पण वाचा : लाडकी बहीण योजना नवीन नियम लागू, लाखो महिलांना मिळणार नाही योजनेचा लाभ
ह्या महिला झाल्या लाडकी योजनेसाठी अपात्र
महायुती सरकारकडून लवकरच लाडकी बहीण योजनेचा सहवा हप्ता महिलांच्या खात्यात जमा करणार आहे परंतु अशा अनेक महिला आहेत ज्यांना या योजनेअंतर्गत पाच हप्त्याचे पैसे तर मिळाले परंतु इथून पुढे अनेक महिलांना या योजनेचा पैसा मिळणार नाही यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार निराधार योजनेच्या सर्व पात्र महिला लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र करण्यात आलेल्या आहेत.
या महिलांना मिळणार एवढे पैसे
राज्यामध्ये अशा अनेक महिला आहेत ज्यांचे अर्ज मंजूर असून सुद्धा त्यांना या योजनेचा एक हप्ता मिळाला नाही अशा महिलांना उर्वरित पाच हप्त्याचे पैसे 7500 हजार रुपये आणि डिसेंबर महिन्याचे वाढीव 2100 रुपये असे एकत्रित नऊ हजार सहाशे रुपये जमा केले जाणार आहे आणि ज्या महिलांना पाच हप्त्याचे पैसे मिळाले आहे अशा महिलांच्या खात्यात डिसेंबर महिन्याचा हप्ता 2100 रुपये जमा केला जाणार आहे.
नमस्कार मी चंद्रकांत घोडके मागील दहा वर्षापासून सरकारी योजना संदर्भात ब्लॉगिंग व यूट्यूब च्या माध्यमातून माहिती देत आहे, त्यामुळे आपल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना च्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला जे काही माहिती दिली जात आहे ती अभ्यासपूर्वक दिली जात आहे .