Ladki Bahin Yojana 3rd Kist Update In Marathi : महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना आर्थिक बळ देण्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांना महाराष्ट्र सरकार दर महिन्याला 1500 रुपये देत आहे आतापर्यंत या योजनेचे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून पात्र महिलांना तीन हजार रुपये सरकारने दिलेली आहेत परंतु अनेक महिलांचे अर्ज मंजूर असताना आणि त्याच प्रमाणे नवीन अर्ज करणाऱ्या महिलांना या योजनेच्या तिसऱ्या हप्त्याची प्रतीक्षा आहे.
अशा सर्व महिलांची आता प्रतीक्षा खतम झालेली आहे कारण सरकारकडून या योजनेचा तिसरा हप्ता पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्याची प्रक्रिया आज दिनांक 25 सप्टेंबर 2024 पासून सुरु करण्यात आलेली आहे परंतु कोणत्या महिलांना या योजनेचा तिसरा हप्ता मिळला आणि त्याची रक्कम काय आहे या संदर्भात संपूर्ण माहिती आपण पुढे पाहूया.
Table of Contents
फक्त याच बहिणीच्या खात्यात जमा होणार 4500 हजार रुपये
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिलांनी सुरुवातीला अर्ज केले होते परंतु काही कारणामुळे त्यांना या योजनेचा हप्ता मिळाला नाही अशा सर्व महिलांना या योजनेच्या तिसऱ्या हप्त्यांमध्ये त्यांच्या बँक खात्यात 4500 हजार रुपये सरकार जमा करणार आहे आणि काही महिलांच्या खात्यात 25 सप्टेंबर 2024 रोज बुधवार सकाळी 9 वाजता पासून महिलांच्या खात्यात पैसे जमा होत आहे.
हे पण वाचा : अशाप्रकारे चेक करा लाडकी बहीण योजनेचे पैसे आले का नाही फक्त 1 मिनिटात
पुढील चार दिवसात जमा होणार या योजनेचा तिसरा हप्ता
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आज दिनांक 25 सप्टेंबर 2024 ते 29 सप्टेंबर 2024 पर्यंत या योजनेचा पैसा सर्व महिलांच्या खात्यात जमा होणार आहे करिता महिलांनी तात्काळ आपली बँक खाते आधार लिंक करून घ्यावे जेणेकरून या योजनेचा पैसा महिलांच्या खात्यात जमा होईल.
या महिलांना मिळणार तिसरा हप्ता 1500 हजार रुपये
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याची मिळून तीन हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा झालेले आहे अशा सर्व महिलांना या योजनेच्या तिसऱ्या हप्त्यात 1500 हजार रुपये मिळणार आहे.
कायमस्वरूपी अर्ज रद्द झालेली महिलांना पुन्हा एकदा मिळणार संधी
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिलांनी ऑनलाईन अर्ज सादर केली होती परंतु काही कारणास्तव किंवा तांत्रिक अडचणीमुळे त्या महिलेचा अर्ज कायमस्वरूपी रद्द झालेला आहे अशा सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे सरकार अशा सर्व महिलांना पुन्हा एकदा अर्ज करण्याची संधी देणार आहे .
नमस्कार मी चंद्रकांत घोडके मागील दहा वर्षापासून सरकारी योजना संदर्भात ब्लॉगिंग व यूट्यूब च्या माध्यमातून माहिती देत आहे, त्यामुळे आपल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना च्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला जे काही माहिती दिली जात आहे ती अभ्यासपूर्वक दिली जात आहे .
1 thought on “Ladki Bahin Yojana 3rd Kist Update :₹4500 हजार रुपये महिलांच्या खात्यात आज पासून जमा होणे सुरू, लगेच चेक करा तुमचे खाते”