Ajit Pawar On Majhi Ladki Bahin Yojana : राज्य सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे परंतु या योजनेच्या आर्थिक तरतुदी संदर्भात अडचण असल्याचं स्वतः अर्थ विभागाने म्हटल्याची माहिती समोर येत आहे, योजनेसाठी दरवर्षी 30 हजार कोटी रुपये कुठून आणणार ? यासंदर्भात तरतूद कशी करायची ? राज्याची आर्थिक स्थिती कमजोर आहे अशा काही चर्चासमोर येत होत्या या चर्चावर पूर्णविराम देत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्याकडून ह्या संदर्भात खुलासा करण्यात आलेले आहे .
Table of Contents
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजना 2024
महाराष्ट्र शासनाकडून 28 जून 2024 रोजी राज्यातील महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनेच्या माध्यमातून आर्थिक दृष्ट्या गरीब व कमी उत्पन्न असलेल्या परिवारातील महिलांना राज्य सरकारकडून 1500 रुपये प्रति महिना देण्यात येणार आहे या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया 1 जुलै 2024 पासून सुरु करण्यात आलेली आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2024 आहे
Ladka Bhau Yojana Online Apply 2024 : सभी युवा को मिलेंगे ₹10000 हजार रुपये प्रति महिना
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजना आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- आदिवासी प्रमाणपत्र, जन्म दाखला, शाळा सोडण्याचा दाखला, मतदान कार्ड ( यापैकी कोणतेही एक 15 वर्षाचा पुरावा जोडावा लागेल )
- उत्पन्नाचा दाखला किंवा राशन कार्ड
- हमीपत्र
- अर्जदार महिलेचा फोटो
माझी लाडकी बहीण योजनेचे सर्व GR डाउनलोड लिंक
Ajit Pawar On Majhi Ladki Bahin Yojana / काय म्हणाले उपमुख्यमंत्री
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी ट्विटर च्या माध्यमातून अशा निराधार बातम्या देणे थांबवावे असे आवाहन केले आहे. मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेला अर्थ विभागाचा विरोध आहे, अशा बातम्या समोर येत होत्या प्रचार माध्यमातून येणाऱ्या बातम्या निराधार वास्तवाच्या पलीकडे आणि राजकीय हेतूपेरीत दिसत आहे असे ते म्हणाले.
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या यशस्वीतेसाठी जास्तीत जास्त भगिनींना सहभागी करून घेण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असे आवाहन पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली त्याचबरोबर आंदोलनाच्या बातम्या वर विश्वास ठेवू नये असे ते स्पष्ट म्हणाले .
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री या नात्याने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना राज्याच्या 2024-25 च्या अतिरिक्त अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आली आहे वित्त आणि नियोजन व सर्व विभाग आणि राज्य मंत्रिमंडळाच्या मान्यनंतरच ही योजना राजाच्या अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलेली आहे असे स्पष्ट अजित पवार जी यांनी म्हटले आहे .
राज्याच्या अर्थसंकल्पात 35 हजार कोटीची तरतूद
Ajit Pawar On Majhi Ladki Bahin Yojana : आर्थिक वर्षात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक असलेली एकूण 35 हजार कोटी रुपयांची तरतूद यंदाच्या अर्थसंकल्पात करण्यात आलेली आहे त्यामुळे योजनेसाठी पैसे कुठून येणार असे काही प्रश्न निर्माण होत होते ? त्यावर उत्तर देत महाराष्ट्र सारख्या आर्थिक दृष्ट्या संपन्न राज्याला एवढा खर्च करणे शक्य आहे असे स्पष्ट त्यांनी जाहीर केले .
राज्यातील महिला, मुलींना आर्थिक स्वतंत्र, स्वावलंबन, पोषण आणि सक्षमीकरणासाठी आणि सन्मान आणि स्वाभिमान वाढवण्यासाठी राज्य सरकार ही रक्कम खर्च करण्यास तयार असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी स्पष्ट म्हटले. त्यामुळे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेला राज्यांमधून कोणाचा विरोध असून नये आणि असू पण शकत नाही असे ते म्हणाले.
Majhi Ladki Bahin Yojana Online Apply 2024
नमस्कार मी चंद्रकांत घोडके मागील दहा वर्षापासून सरकारी योजना संदर्भात ब्लॉगिंग व यूट्यूब च्या माध्यमातून माहिती देत आहे, त्यामुळे आपल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना च्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला जे काही माहिती दिली जात आहे ती अभ्यासपूर्वक दिली जात आहे .
2 thoughts on “Ajit Pawar On Majhi Ladki Bahin Yojana : माझी लाडकी बहिन योजना अडचणीत, अर्थ विभाचा विरोध, काय म्हणाले राज्याचे उपमुख्यमंत्री”