Ladki Bahin 6th Kist : मंत्रीमंडळाच्या पहिल्याच बैठकीतुन लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी , डिसेंबर च्या हप्त्या संदर्भात मोठी उपडेट

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ladki Bahin 6th Kist News In Marathi : महाराष्ट्र राज्यामध्ये मागील झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला मोठे यश प्राप्त झाले आणि 5 डिसेंबर 2024 रोजी महायुती सरकारचा शपथविधी सोहळा संपन्न झाला त्यामध्ये देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्याकडून उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यात आली आणि या शपथविधीनंतर मंत्रिमंडळाची पहिलीच बैठक पार पडली या बैठकीमध्ये महिलांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आले तर आज आपण या संदर्भात संपूर्ण माहिती पुढे पाहणार आहोत.

आता ह्याच महिलांना मिळणार 2100 रुपये

राज्यामध्ये पुन्हा महायुती सरकार स्थापन झालेले आहे आणि पाच डिसेंबर 2024 रोजी शपथविधी सोहळा संपन्न झाला आणि शपथविधी सोहळा संपन्न झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेमध्ये पत्रकाराने काही लाडकी बहीण योजने संदर्भात प्रश्न विचारले असता त्यावर उत्तर देते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजना ही योजना सुरूच राहणार ही योजना आमचे सरकार बंद करणार नाही परंतु या योजनेअंतर्गत सरसकट सर्व महिलांना लाभ दिला जाणार नाही

त्यामध्ये फक्त योजनेच्या पात्रतेना पूर्ण करणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ दिला जाईल व त्याचप्रमाणे आर्थिक दृष्ट्या व गरीब परिवारातील महिलांनाच या योजनेचा लाभ मिळावा आणि कोणत्याही गरीब महिला वंचित राहणार नाहीत यांचे पण आम्ही काळजी घेणार.

Ladki Bahin 6th Kist
Ladki Bahin 6th Kist

लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी जमा होणार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना लाडकी बहीण योजने संदर्भात महत्त्वाची माहिती दिली महाराष्ट्र राज्याच्या अंतरीम अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली होती या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना पंधराशे रुपये दरमहा देण्यात येत आहे आतापर्यंत या योजनेअंतर्गत नोव्हेंबर पर्यंतचे पैसे महिलांच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहे डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे महिलांचे लक्ष आहे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता या प्रश्नाचे उत्तर देत त्यांनी म्हटले आजच मंत्रिमंडळाची बैठक पूर्ण झालेली आहे आणि या बैठकीमध्ये आम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने संदर्भात अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहे की तातडीने डिसेंबर चा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा झाला पाहिजे

हे पण वाचा : लाडक्या बहिणीच्या अर्जाची होणार पुन्हा पडताळणी, या निर्णयामुळे होणार लाखो महिला अपात्र

आम्ही जे निर्णय घेतो ते फक्त कागदावरच राहिली नाहीत तर त्याची अंमलबजावणी देखील लगेच केली आहे त्यामुळेच आम्हाला पुन्हा जनतेचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळालेला आहे त्यामुळे महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता काही दिवसात जमा होण्याची शक्यता आहे.

1 thought on “Ladki Bahin 6th Kist : मंत्रीमंडळाच्या पहिल्याच बैठकीतुन लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी , डिसेंबर च्या हप्त्या संदर्भात मोठी उपडेट”

Leave a Comment