Ladki Bahin Free Gas Cylinder News In Marathi : महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केली या योजनेला राज्यभरातून महिलांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आणि सरकारने या योजनेला पूर्ण क्षमतेने राबवून महिलांना लाभ दिला ज्या महिलांच्या परिवाराचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे अशा महिलांना सरकार हे योजनेअंतर्गत 1500 रुपये देत आहे त्याचप्रमाणे सरकारकडून लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांना मोफत तीन गॅस सिलेंडर देत आहे.
जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहात आणि तुम्हाला आतापर्यंत मोफत गॅस सिलेंडर मिळालेली नाही तर आज आपण या संदर्भात सविस्तर माहिती पुढे पाहणार आहोत.
फ्री 3 गॅस सिलेंडर वाटप प्रक्रिया सुरू
महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना आर्थिक फटका बसू नये यासाठी मागील झालेल्या 2024-25 च्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना अंतर्गत वार्षिक मोफत तीन गॅस सिलेंडर ( Free Gas Cylinder ) देण्यासंदर्भात तरतूद करण्यात आलेली होती आणि सरकारकडून लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांना मोफत गॅस सिलेंडर देणे सुरू करण्यात आलेले आहे मीडिया रिपोर्टच्या माहितीनुसार सरकारने आतापर्यंत एक कोटी पेक्षा अधिक महिलांना गॅस सिलेंडर दिलेली आहेत.
मोफत गॅस सिलेंडरची पात्रता
- महिलाही लाडकी बहीण योजनेची लाभार्थी असणे आवश्यक
- प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या महिला पण पात्र असतील
- महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे
मोफत गॅस सिलेंडर साठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- राशन कार्ड
- पासपोर्ट साईज फोटो
- अर्ज
Ladki Bahin Free Gas Cylinder अर्ज प्रक्रिया
मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेअंतर्गत वार्षिक तीन गॅस सिलेंडर ( ( Free Gas Cylinder ) सरकारकडून दिले जात आहे जर तुम्हाला आतापर्यंत या योजनेअंतर्गत लाभ मिळाला नाही तर त्यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागतो त्याची प्रक्रिया खालील प्रमाणे आहे.
- सर्वात पहिले तुम्हाला जवळच्या गॅस एजन्सी मध्ये जावे लागेल
- त्यानंतर तुम्हाला त्यांच्याकडून प्रधानमंत्री उज्वला योजनेचा अर्ज घ्यावा लागेल
- अर्जामध्ये मागितलेली सर्व माहिती अचूक पद्धतीने भरून व त्यासोबत आवश्यक कागदपत्रे जोडून घ्यावे
- त्यानंतर तुम्हाला अर्ज व कागदपत्रे गॅस एजन्सी अधिकाऱ्याजवळ द्यावे लागेल
- त्यांच्यामार्फत तुमचा प्रधानमंत्री उज्वला योजनेसाठी ऑनलाईन अर्ज केला जाईल
- मंग तुम्हाला प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत नवीन गॅस कनेक्शन दिले जाईल.
अशा प्रकारे तुम्ही या योजनेसाठी अर्ज सादर करू शकता जर तुमच्याकडे अगोदरच प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत गॅस कलेक्शन आहे तर तुम्हाला नवीन अर्ज करण्याची आवश्यकता नाही.
मोफत 3 गॅस सिलेंडर लाभ कधी मिळणार
महाराष्ट्र सरकारकडून राज्यातील लाडकी बहीण योजनेच्या व तसेच प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या पात्र महिलांना वार्षिक तीन गॅस सिलेंडर मोफत दिले जात आहे सरकारकडून ऑक्टोबर महिन्यापासून ह्या योजनेअंतर्गत लाभ दिला जात आहे राज्यातील महिलांना अगोदर गॅस सिलेंडर भरून घ्यायची आहे त्यानंतर सरकारकडून गॅस सिलेंडरची रक्कम आधार लिंक बँक खात्यात पाठवली जात आहे.
हे पण वाचा : महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा, आता 2100 रुपये या तारखेला जमा होणार
सरकारकडून मोफत तीन गॅस सिलेंडर पैकी एक गॅस सिलेंडरचे पैसे ऑक्टोबर महिन्यात महिलांच्या खात्यात जमा केलेले आहेत जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या किंवा प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या लाभार्थी आहात आणि तुम्हाला आतापर्यंत एकही गॅस सिलेंडरचा पैसा मिळाला नाही तर तुम्हाला जवळच्या गॅस एजन्सी मध्ये जाऊन या संदर्भात माहिती द्यावी लागेल आणि त्यांच्याकडून तुम्हाला या योजनेअंतर्गत मोफत तीन गॅस सिलेंडर देण्या संदर्भात मदत केली जाईल.
नमस्कार मी चंद्रकांत घोडके मागील दहा वर्षापासून सरकारी योजना संदर्भात ब्लॉगिंग व यूट्यूब च्या माध्यमातून माहिती देत आहे, त्यामुळे आपल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना च्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला जे काही माहिती दिली जात आहे ती अभ्यासपूर्वक दिली जात आहे .