Ladki Bahin 3rd Installment : महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे या योजनेच्या माध्यमातून महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहे आतापर्यंत लाखो महिलांना लाभ देण्यात आलेला आहे परंतु अनेक महिलांची अर्ज मंजूर असताना पण या योजनेचा लाभ त्यांना मिळाला नाही.
अशा सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता उर्वरित पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात केलेली आहे या संदर्भात संपूर्ण माहिती आपण पुढे पाहणार आहोत.
लाडकी बहीण योजना चा तिसरा हप्ता जमा होणे सुरू
मुख्यमंत्री माजी लाडकी योजनेच्या तिसऱ्या आपल्या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले माहितीनुसार या योजनेचा तिसरा हप्ता सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार अशी माहिती मिळाली होती त्याचप्रमाणे सरकारने आजपासून म्हणजे 25 सप्टेंबर 2024 पासून महिलांच्या खात्यात पैसे जमा होणे सुरू झालेले आहे.
ह्या महिलांना जमा झाले 4500 हजार रुपये
मुख्यमंत्री माजी लाडकी योजनेसाठी ज्या महिलांनी ऑनलाईन अर्ज सादर केले होते आणि त्यांच्या अर्ज मंजूर झालेले आहे परंतु त्या महिलांना या योजनेचा लाभ मिळाला नाही अशा सर्व महिलांच्या खात्यात साडेचार हजार रुपये सरकारकडून जमा केली जात आहे त्याचप्रमाणे ज्या महिलांना या योजनेअंतर्गत जुलै आणि ऑगस्ट महिन्याची मिळून तीन हजार रुपये जमा झाले होते अशा सर्व महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये जमा केली जाते.
हे पण वाचा : अशाप्रकारे चेक करा लाडकी बहीण योजनेचे पैसे आले का नाही फक्त 1 मिनिटात
उर्वरित महिलांना या दिवशी मिळणार पैसे
महाराष्ट्र सरकारने 25 सप्टेंबर 2024 पासून महिलांच्या खात्यात या योजनेचा तिसरा हप्ता जमा करण्यास सुरुवात केलेली आहे अनेक महिलांच्या मोबाईलव तिसरा हप्ता जमा झालेला मेसेज पण आलेला आहे आणि उर्वरित महिलांच्या खात्यात सरकारकडून पुढील तीन दिवसांमध्ये पैसे जमा केले जातील अशी माहिती मिळत आहे.
नमस्कार मी चंद्रकांत घोडके मागील दहा वर्षापासून सरकारी योजना संदर्भात ब्लॉगिंग व यूट्यूब च्या माध्यमातून माहिती देत आहे, त्यामुळे आपल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना च्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला जे काही माहिती दिली जात आहे ती अभ्यासपूर्वक दिली जात आहे .
1 thought on “Ladki Bahin 3rd Installment : फक्त ह्या महिलांच्या जमा झाले 4500 हजार रुपये, लाडकी बहिण योजनेचा तिसरा हप्ता जमा होणे सुरू पहा संपूर्ण माहिती”