Ladki Bahin Yojana 7th Hapta Update : लाखो महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा झाले नाही , मुख्य 2 कारणे आले समोर

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ladki Bahin Yojana 7th Hapta Update In Marathi : महाराष्ट्र राज्यातील सर्वात चर्चेत असलेली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेच्या मदतीने विधानसभा निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस सरकारला मोठे यश प्राप्त झालेले आहे हि योजना विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र सरकारने सुरू केली या योजनेच्या माध्यमातून राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब परिवारातील महिलांना 1500 रुपये महिना दिला जाऊ लागला.

आतापर्यंत सरकारने या योजनेअंतर्गत जुलै ते डिसेंबर पर्यंतचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा केलेले आहेत आणि जानेवारी महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात 23 जानेवारी 2025 पासून जमा होण्यास सुरुवात झालेली आहे त्यामध्ये अनेक महिलांच्या खात्यात हप्ता जमा झालेला आहे परंतु अशा अनेक महिला आहेत ज्यांना या योजनेचा सहावा हप्ता मिळाला परंतु त्यांना या योजनेचा सातवा हप्ता मिळालेला नाही तर या संदर्भात काही मुख्य दोन कारणे समोर आलेले आहेत त्याबाबत आपण सविस्तर माहिती पुढे पाहणार आहोत.

लाडकी बहीण योजनेची थोडक्यात माहिती

महाराष्ट्र सरकारने राज्यातील गरीब महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही 28 जून 2024 रोजी सुरू केली या योजनेचे अर्ज प्रक्रिया सरकारने एक जुलै 2024 पासून ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने सुरू केली सरकारकडे 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत 3 कोटीच्या जवळपास ऑफलाईन व ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले त्यामधील सरकारने 2 कोटी 47 लाख महिलांना या योजनेचा लाभ दिला आणि लवकरच या योजनेअंतर्गत महिलांना 2100 रुपये महिना दिला जाणार आहे.

लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांकडे काही आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे त्याची माहिती खालील प्रमाणे आहे .

  • आधार कार्ड
  • बँक पासबुक
  • राशन कार्ड
  • अधिवास प्रमाणपत्र
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • लाडकी बहीण योजनेचा अर्ज
  • हमीपत्र
  • पासपोर्ट साईज फोटो
  • मोबाईल नंबर

लाडकी बहीण योजनेची पात्रता

  • महिलाही महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे
  • महिलाची वय किमान 21 ते 65 वयोगटातील असावे
  • महिलाही इतर आर्थिक योजनेची लाभार्थी नसावी
  • महिलांच्या कुटुंबातील सदस्य नोकरी धारक नसावा
  • महिलांच्या कुटुंबाच्या सदस्यांचे चार चाकी वाहन असावे
  • महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असावे

लाडकी बहीण योजनेच्या सातव्या हप्ता संदर्भात थोडक्यात माहिती

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकारने डिसेंबर 2024 च्या शेवटच्या आठवड्यात लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा केलेला होता. त्यानंतर महिला या योजनेच्या सातव्या हफ्त्याची वाट पाहत होते अशा सर्व महिलांच्या खात्यात सरकारने 23 जानेवारी 2025 पासून या योजनेचा लाभ जमा करण्यास सुरुवात केली व एक कोटी पेक्षा अधिक महिलांच्या खात्यात या योजनेचा लाभ पण जमा झाला.

महिलांच्या खात्यात 1500 रुपये का ? जमा झाले नाही

महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता महिलांच्या खात्यात 23 जानेवारी 2025 पासून जमा करण्यास सुरुवात केलेली आहे आणि अनेक महिलांच्या खात्यात या योजनेचा सातवा हप्ता पण जमा झालेला आहे परंतु अशा अनेक महिला आहेत ज्यांना या योजनेचा सहावा हप्ता मिळाला परंतु या योजनेचा सातवाहप्ता मिळालेला नाही तर अशा महिला संदर्भात काही मुख्य कारणे समोर आलेले आहेत त्याची माहिती खालील प्रमाणे आहे.

Ladki Bahin Yojana 7th Hapta Update
Ladki Bahin Yojana 7th Hapta Update

हे पण वाचा : जानेवारीचे 1500 रुपये आले नाही, तात्काळ करा हे काम जमा होतील पैसे.

मुख्य 2 कारणाची थोडक्यात माहिती

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या काही पात्र महिलांना या योजनेचा सातवा हप्ता मिळाला नाही या संदर्भात काही मुख्य कारणेसमोर आलेले आहेत त्यामध्ये पहिले कारण अशी आहे की ज्या महिला प्रधानमंत्री किसान सन्माननीय निधी योजनेच्या लाभार्थी आहे अशा महिलांना या योजनेतून वगळण्यात आलेला आहे.

त्याचप्रमाणे दुसरे कारण म्हणजे ज्या महिला निराधार योजनेच्या लालाभार्थीआहेत अशा पण महिलांना या योजनेतून वगळण्यात आलेला आहे तसेच ज्या महिला या योजनेच्या निकषात बसत नाहीत अशा पण महिला या योजनेतून सरकारने बाहेर केलेले आहेत.

परंतु ज्या महिला या योजनेच्या निकषात बसतात व त्यांना आर्थिक मदतीची आवश्यकता आहे अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे आणि निकषात बसणाऱ्या महिलांच्या खात्यात सातवा हप्ता जमा झाला नाही तर अशा पुढील 31 जानेवारी 2025 पर्यंत या योजनेचा लाभ जमा होईल.

FAQ- Ladki Bahin Yojana 7th Hapta Update

लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता उर्वरित महिलांच्या खात्यात कधीपर्यंत जमा होणार ?

महाराष्ट्र सरकारकडून लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आलेला आहे आणि उर्वरित महिलांच्या खात्यात 31 जानेवारी 2025 पर्यंत सातवा हप्ता जमा केला जाणार आहेत.

लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2100 रुपये कधी मिळणार आहे ?

महाराष्ट्र सरकारकडून लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2100 रुपये महिना मार्च 2025 नंतर या योजनेच्या पात्र महिलांना दिला जाणार आहे.

1 thought on “Ladki Bahin Yojana 7th Hapta Update : लाखो महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा झाले नाही , मुख्य 2 कारणे आले समोर”

Leave a Comment