Ladki Bahin Yojana Good News ; महाराष्ट्र सरकारकडून सुरू असलेली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू होऊन पूर्ण एक महिना होत आहे राज्य सरकारकडे या योजनेचे अर्ज कोटीच्या घरात प्राप्त झाले आहेत, राज्यातील अनेक महिलांचेअर्ज पडताळणी करून सरकारने मंजूर पण केले आहेत.
सरकारने मागील काही दिवसा अगोदर जाहीर केले होते की 15 ऑगस्ट किंवा 19 ऑगस्ट या दिवशी राज्यातील पात्र महिलांच्या खात्यात 3000 रुपये पाठवले जाणार आहे त्याचप्रमाणे काही पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात या तारखेच्या अगोदरच पैसे जमा होणे सुरू झालेले आहे चला तर पाहूया पूर्ण माहिती.
लाडकी बहीण योजना चे वैशिष्ट्ये
मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजना पूर्ण महाराष्ट्रभर फेमस झाले आहे या योजनेसाठी महाराष्ट्रभरातून दोन कोटीच्या जवळपास ऑनलाईन अर्ज प्राप्त झाली आहे या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार गरीब परिवारातील महिलांना दर महिन्याला 1500 देणार या योजनेचा लाभ घेऊन महाराष्ट्र राज्यातील महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील या उद्देशाने ही योजना महाराष्ट्र सरकार राबवित आहे आणि या योजनेला पूर्ण महाराष्ट्रभरातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतानादिसत आहे.
या महिलांना नाही मिळणार पैसे
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता लवकरच पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात जमणार आहे परंतु आतापर्यंत ज्या महिलांनी आपले अर्ज ऑनलाईन केले नाही किंवा अर्ज त्रुटी साठी परत पाठवले असता त्रुटी पूर्ण करून पुन्हा अर्ज सादर केले नाहीत अशा लाखो महिलांच्या खात्यात या योजनेचा पहिला हप्ता जमा होणार नाही आहे .
लाखो महिला या योजनेसाठी अपात्र ठरणार, सरकारने केले नवीन नियम जाहीर, पहा नवीन नियम काय आहे
महिलांच्या खात्यात पैसे जमा होणे सुरू
महाराष्ट्र शासनाकडून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जाणार आहे आणि याच दरम्यान अनेक महिलांच्या खात्यामध्ये या योजनेच्या अंतर्गत एक रुपया जमा केला गेला आहे, त्यासंदर्भात अनेक प्रश्न निर्माण होत होते ह्या प्रश्नावर उत्तर देत राज्याचे महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी माहिती देताना सांगितले की
Ladki Bahin Yojana Official Website Launch , Online Apply, New Registration
पात्र अर्जदारांच्या खात्यात पैसे जमा होईपर्यंत या संपूर्ण प्रक्रियेची तांत्रिक पडताळणी करण्यासाठी प्रायोगिक तत्वावर काही निवडक अर्जदार महिलांच्या बँक खात्यात १ रुपया जमा करणार आहोत. हा १ रुपया सन्मान निधी नसून तांत्रिक पडताळणीचा भाग असेल. तेव्हा यासंदर्भात माता भगिनींनी कोणत्याही प्रकारच्या अपप्रचाराला व गैरसमजाला बळी पडू नये, असे आवाहन त्यांनी केले .
नमस्कार मी चंद्रकांत घोडके मागील दहा वर्षापासून सरकारी योजना संदर्भात ब्लॉगिंग व यूट्यूब च्या माध्यमातून माहिती देत आहे, त्यामुळे आपल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना च्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला जे काही माहिती दिली जात आहे ती अभ्यासपूर्वक दिली जात आहे .
1 thought on “Ladki Bahin Yojana Good News : लाडकी बहीण योजनेचे 3000 जमा होणे सुरू, सरकारने पाठवले पात्र महिलांच्या खात्यात पैसे”