Majhi Ladki Bahin Yojana Good News : मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाकडून राज्यातील महिलांच्या खात्यामध्ये थेट ₹3000 रुपये पाठवले जाणार आहेत या संदर्भात संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला पुढे सांगणार आहोत की हे सरकार कोण्या दिवशी महिलांच्या खात्यात पैसे जमा करणार .
Majhi Ladki Bahin Yojana चे वैशिष्ट्ये
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही एक महाराष्ट्र शासनाची महत्त्वकांशी योजना आहे सरकारकडून निवडणुकीच्या तोंडावर या योजनेची घोषणा करण्यात आली . या योजनेच्या माध्यमातून राज्यातील पात्र महिलांना सरकार दरमहा 1500 रुपये देणार आहे आणि या योजनेला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे महाराष्ट्र शासनाकडून या योजनेची अर्ज प्रक्रिया 1 जुलै 2024 पासून सुरू करण्यात आलेली आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2024 आहे .
महाराष्ट्र शासनाकडून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना त्रास होऊ नये म्हणून सरकार देखील या योजनेची अंमलबजावणी वेगवान पद्धतीने केली आहे . महिलांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी कमीत कमी कागदपत्रे सादर करून लाभ घेण्याची सवलत सरकारने दिली आहे .
माझी लाडकी बहीण योजनेचे सर्व GR डाउनलोड लिंक : Majhi Ladki Bahin Yojana GR PDF Download
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना खालील कागदपत्रे सादर करावी लागतील .
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- अधिवास प्रमाणपत्र, शाळा सोडण्याचा दाखला, जन्म दाखला, मतदार कार्ड( यापैकी एक )
- हमीपत्र
- उत्पन्न प्रमाणपत्र किंवा राशन कार्ड ( यापैकी एक )
- बँक पासबुक
- अर्जदार महिलांची लाईव्ह फोटोलाईफ फोटो
- बँक पासबुक आधार लिंक असणे आवश्यक आहे
Majhi Ladki Bahin Yojana ची पात्रता काय आहे
- महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे
- विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्त्या व निराधार महिला
- 21 ते 65 वर्ष आतील सर्व महिला या योजनेसाठी पात्र आहेत.
- लाभार्थी महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक २.५ लाखापेक्षा कमी असणे आवश्यक
Majhi Ladki Bahin Yojana ची अपात्रता काय आहे
- लाभार्थी महिलांच्या कुटुंबातील सदस्य आयकरता नसावा
- कुटुंबातील सदस्य नियमित/कायम कर्मचारी/कंत्राटी कर्मचारी भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नसावा
- महाराष्ट्र शासनाच्या इतर कोणत्या योजना 1500 रुपये आर्थिक सहायता घेत नसावा
- कुटुंबातील सदस्यांच्या नावेचार चाकी वाहन असल्यास ती महिला अपात्र ठरणार ( ट्रॅक्टर वगळून )
- कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड/कॉर्पोरेशन उपक्रमाच्या अध्यक्ष//उपाध्यक्ष संचालक, सदस्य नसावा
Majhi Ladki Bahin Yojana Online Apply प्रक्रिया
- अर्ज करण्यासाठी Majhi Ladki Bahin Yojana Official Website ( https://majhiladkibahin.in ) वर जावे लागेल
- योजनेस संदर्भात आपल्या मनामधील प्रश्न व माहिती यामध्ये दिलेली आहे
- त्यानंतर तुम्हाला Narishakti Doot – Apps मोबाईल मध्ये डाउनलोड करावा लागेल
- तुमच्यासमोर लॉगिन हा पेज ओपन होणार
- तुमच्याजवळ असलेला मोबाईल नंबर टाकावा
- मोबाईलवर एक ओटीपी येणार ते टाकून लॉगिन करून घ्यावा
- ही प्रक्रिया झाल्यानंतर तुमच्यासमोर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दिसेल यावर क्लिक करावा लागेल
- आता आपल्यासमोर अर्ज फॉर्म ओपन होईल त्यामध्ये संपूर्ण माहिती भरून घ्यावी
- सर्व माहिती व्यवस्थित भरल्यानंतर तुम्हाला तुमचे सर्व कागदपत्रे अपलोड करावी लागते
- माहिती व कागदपत्रे अपलोड केल्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करून द्यावे
- आता तुम्ही दिलेल्या मोबाईलवर एक ओटीपी येणार ती ओटीपी टाकून अर्ज सबमिट करून घ्यावा
अशा सोप्या पद्धतीने तुम्ही घरबसल्या आपल्या मोबाईल फोनवर या योजनेसाठी अर्ज करू शकता
₹3000 रुपये या दिवशी महिलांच्या खात्यात जमा होणार
या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाने खूप सार्या अटी व नियमांमध्ये शितलता आणली आहे त्यामुळे या योजनेचा लाभ घेणे अगदी सोपे झाले आहे आणि खूप साऱ्या महिला या योजनेसाठी अर्ज करीत आहेत याच दरम्यान महाराष्ट्र शासनाकडून या योजनेच्या पात्र महिलांची यादी लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार 17 ऑगस्ट च्या दिवशी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. जुलै 2024 आणि ऑगस्ट 2024 अशा दोन्ही महिन्याचे मिळून ₹3000 रुपये थेट महिलांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे .
पण या महिलांना नाही मिळणार पैसे
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्य शासनाकडून ऑनलाइन प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे परंतु अनेक महिलांनी आतापर्यंत आपले अर्ज सादर केले नाही त्यामुळे त्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करून घ्यावे
ज्या महिलांनी सर्वात प्रथम अर्ज सादर केलेले आहे अशा महिलांची यादी लवकरच राज्य शासनाकडून जाहीर करण्यात येणार आहे आणि त्या महिलांना पैसे मिळणार आहे आणि ज्या महिलांनी अद्याप आता पण अर्ज केला नाही अशा महिलांना ही 3000 रुपये मिळणार नाहीत.
Majhi Ladki Bahin Yojana Important Link
Majhi Ladki Bahin Yojana All GR | Click Here |
Official website | Click Here |
Majhi Ladki Bahin Yojana Hamipatra pdf | Click Here |
Majhi Ladki Bahin Yojana Online Apply Link | Click Here |
Majhi Ladki Bahin Yojana Application Form pdf | Click Here |
re-Apply Ladki Bahin Yojana Reject Form | Click Here |
Nari Shakti Doot App Download | Click here |
Ladka Bhau Yojana Online Apply 2024 : सभी युवा को मिलेंगे ₹10000 हजार रुपये प्रति महिना
नमस्कार मी चंद्रकांत घोडके मागील दहा वर्षापासून सरकारी योजना संदर्भात ब्लॉगिंग व यूट्यूब च्या माध्यमातून माहिती देत आहे, त्यामुळे आपल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना च्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला जे काही माहिती दिली जात आहे ती अभ्यासपूर्वक दिली जात आहे .
15 thoughts on “Majhi Ladki Bahin Yojana : ₹3000 रुपये या दिवशी महिलांच्या खात्यात जमा होणार , पण या महिलांना नाही मिळणार पैसे, पहा संपूर्ण माहिती पहा”