Ladki Bahin Yojana New List : फक्त याच महिलांना मिळणार योजनेचे पैसे, सरकारने केली नवीन यादी जाहीर , लगेच तपास तुमचे नाव

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ladki Bahin Yojana New List News In Marathi : महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या अंतर्गत राज्यातील 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिलांना राज्य सरकारकडून 1500 रुपये महिना दिला जात आहे अशातच लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांसाठी सर्वात मोठी बातमी समोर येत आहे अनेक महिलांना सरकार ह्या योजनेतून वगळणार अशी जोरदार चर्चा सुरू आहे.

त्याचप्रमाणे सरकारकडून काही निवडक महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे अशी माहिती समोर येत आहे आणि लाखो महिलांना या योजनेतून वगळण्यात येणार अशी पण माहिती समोर येत आहे तर आज आपण या संदर्भात सविस्तर माहिती पुढे पाहणार आहोत.

या महिलांना योजनेतून वगळण्याचे संकेत

महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात चर्चेत असलेली लाडकी बहीण योजना या योजनेच्या मदतीने महायुती सरकारला मोठे यश प्राप्त झालेले आहेत व महायुतीच्या अनेक नेत्यांकडून विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महिलांना आश्वासन देण्यात आले होते की राज्यात महायुती सरकार पुन्हा एकदा स्थापन झाल्यास या योजनेअंतर्गत महिलांना 2100 रुपये महिना दिला जाईल.

लाडकी बहीण योजनेच्या मदतीने राज्यात महायुती सरकार पुन्हा स्थापन झाले व महिलांच्या खात्यात सरकार कडून डिसेंबर महिन्याचा पैसे जमा करण्यात आले व लवकरच या योजनेअंतर्गत महिलांना 2100 रुपये दिले जाणार आहे. परंतु अशातच सरकार लाडकी बहीण योजनेच्या मंजूर अर्जाची फेर पडताळणी करणार अशी जोरदार चर्चा सुरू आहे आणि ज्या महिला या योजनेच्या निकषात बसणार नाहीत अशा महिलांना या योजनेतून वगळण्यात येणार.

हे पण वाचा : आनंदाची बातमी पुढील 48 तासात जमा होणार ₹3000 हजार रुपये ?

Ladki Bahin Yojana New List
Ladki Bahin Yojana New List

यासंदर्भात माहिती मिळाली असता महाराष्ट्र सरकारकडून सरसकट मंजूर अर्जाची पडताळणी केली जाणार नाही ज्या महिलांच्या अर्जा संदर्भात महिला व बालकल्याण विभागाकडे तक्रारी येथील त्याच महिलेच्या अर्जाची पुन्हा पडताळणी केली जाणार आणि जर महिला या योजनेच्या निकषात बसणार नाही त्या महिलांना कायमस्वरूपी योजनेतून वगळण्यात येणार.

फक्त याच महिलांना मिळणार योजनेचे पैसे

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची माहिती दिली ते माध्यमांशी बोलत असताना लाडकी बहीण योजने संदर्भात त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारले असता ते म्हणाले की ज्या महिला या योजनेच्या निकषात बसणार नाहीत त्या महिलांना या योजनेतून वगळण्यात येणार व त्याचप्रमाणे ज्या महिला योजनेच्या निकषांमध्ये बसतात अशा सर्व पात्र महिलांना या योजनेअंतर्गत लाभ मिळत राहणार कारण सरकार फक्त गरीब परिवारातील महिलांना लाभ मिळावा यासाठी ही योजना सुरू केलेली आहे.

1 thought on “Ladki Bahin Yojana New List : फक्त याच महिलांना मिळणार योजनेचे पैसे, सरकारने केली नवीन यादी जाहीर , लगेच तपास तुमचे नाव”

Leave a Comment