ReApply Ladki Bahin Yojana Reject form : मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाखो महिलांनी आपले ऑनलाइन अर्ज सादर केले आहे . तालुकास्तरीय समितीमार्फत त्या अर्ज पडताळणी सुरू आहे परंतु अनेक महिलांचे अर्ज काही त्रुट्या मुळे रद्द करण्यात आले, परंतु सरकारकडून रद्द झालेले अर्ज पुन्हा एकदा त्रुटी दुरुस्त करून सादर करण्याची संधी देण्यात अली आहे .
जर अर्जदार महिलांनी आपल्या अर्जाची त्रुटी दुरुस्त करून अर्ज सादर केला नाही अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही, तर आज आपण Ladki Bahin Yojana Application Status, Ladki bahin yojana Approved list, How to re-Apply Ladki Bahin Yojana Reject Form , ladki bahin yojana online apply link, Ladki Bahin Yojana Reject Reasons List या सर्व संदर्भात माहिती पाहणार आहोत.
Table of Contents
Ladki Bahin Yojana Reject Reasons List
- नोंदविणारे नाव व आधार कार्ड वरील नाव यात फरक आहे
- अर्जदार मुलींचे वय 21 ते 65 वयोगटात बसत नाही
- अर्जदार महिलेचा पत्ता आधार कार्ड नुसार नाही
- अर्जदार महिलेचे अधिवास प्रमाणपत्र/जन्म प्रमाणपत्र/शाळा सोडण्याचा दाखला/ 15 वर्षांपूर्वीचे राशन कार्ड/15 वर्षे पूर्वीचे मतदान कार्ड/यापैकी कोणते एक कागदपत्रे जोडलेले नाही किंवा चुकीचे जोडले आहे
- आधार कार्ड क्रमांक चुकीचा नोंदवलेला आहे
- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 पेक्षा अधिक आहे
- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 पेक्षा कमी असल्याचे प्रमाणपत्र किंवा केसरी राशन कार्ड व पिवळे राशन कार्ड जोडलेले नाही
- बँक खात्याची तपशील ( खातेदाराचे नाव/बँकेचे नाव/खाते क्रमांक/आयएफसी कोड ) योग्य नाही
- बँक खाते आधार लिंक नाही
- अर्जदाराने हमीपत्र दिलेले नाही अथवा हमी पत्रात त्रुटी आहे
- कुटुंबातील एका पेक्षा जास्त अविवाहित महिलेने योजनेचे लाभ यापूर्वीच घेतला आहे
योजनेचे अर्ज रद्द होण्याची अजून काही कारणे आहेत परंतु काही निवडक कारणे आम्ही तुम्हाला वरी दिलेले आहेत त्यामुळे अर्ज करताना या सर्व बाबीवर लक्ष करून व्यवस्थितपणे अर्ज सादर करावा.
Ladki Bahin Yojana Application Status
- अर्जाची त्रुटी दूर करण्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला नारीशक्ती दूत ॲप ओपन करायचा आहे.
- त्यामध्ये तुम्हाला केलेले अर्ज या ऑप्शन वर क्लिक करायचं आहे .
- तुमच्यासमोर तुम्ही केलेल्या अर्ज ओपन होतील .
- ज्या अर्जाची तुम्हाला त्रुटी दूर करायचे आहेत त्या अर्जावर क्लिक करावे .
- आता तुमच्यासमोर तुमच्या अर्जाची स्थिती दिसेल .
- जर तुमचा अर्ज Disapproved दिसत आहे तर तुमचा अर्ज काही कारणा मुळे रिजेक्ट केलेला आहे.
- आता तुम्हाला View Reasons हे ऑप्शन क्लिक करायचे आहे
- त्यानंतर तुम्हाला तुमच्या अर्जामध्ये कोणती त्रुटी आहेत ते तुम्हाला दिसेल .
re-Apply Ladki Bahin Yojana Reject Form
- अर्जाची त्रुटी दूर करण्यासाठी तुम्हाला फक्त एक संधी मिळेल याची नोंद ठेवावी
- तुमच्या अर्जाची जी पण काही त्रुटी असेल ते दूर करण्यासाठी तुम्हाला Edit Form ह्या ऑप्शन वर क्लिक करायचा आहे.
- आता तुमच्यासमोर परत एकदा योजनेचा अर्ज ओपन होईल त्यामध्ये तुमची जे काही त्रुटी आहे ते व्यवस्थितपणे भरून घ्यावी
- सर्व माहिती अचूक पद्धतीने भरल्यानंतर तुम्हाला तुमचा अर्ज माहिती UPDATE करा या ऑप्शन वर क्लिक करायचा आहे
- अर्ज सबमिट झाल्यानंतर तुमच्या मोबाईलवर OTP येणार ओटीपी व्हेरिफाय करून घ्यावी
अशाप्रकारे तुम्ही परत एकदा तुमचा अर्ज त्रुटी दूर करून सादर करू शकता .
Ladki Bahin Yojana Online Apply Important Link
Ladki Bahin Yojana Official Website Portal Apply Link | Click Here |
Ladki Bahin Online Aadhar Link | Click Here |
Ladki Bahin Aadhar Link Check | Click Here |
re-Apply Ladki Bahin Yojana Reject Form | Click Here |
FAQ- Re-Apply Ladki Bahin Yojana Reject Form
लाडकी बहीण योजनेची त्रुटी दूर करून अर्ज सादर केल्यानंतर किती दिवसात मंजूर होईल ?
1 ते 15 दिवसाच्या आत तुमचा अर्ज मंजूर होईल
लाडकी बहीण योजनेसाठी केलेल्या अर्जाची स्थिती कशी तपासावी ?
अर्जाची स्थिती पाहण्यासाठी तुम्हाला नारीशक्ती दूत ॲप हे ओपन करून केलेली अर्ज ह्या ऑप्शन वर क्लिक करायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या अर्जाची स्थिती दिसेल .
नमस्कार मी चंद्रकांत घोडके मागील दहा वर्षापासून सरकारी योजना संदर्भात ब्लॉगिंग व यूट्यूब च्या माध्यमातून माहिती देत आहे, त्यामुळे आपल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना च्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला जे काही माहिती दिली जात आहे ती अभ्यासपूर्वक दिली जात आहे .
server not responding what we should do . from last three days i am trying for this .
ladki behen yojana money not recieved
There is no approved application list, also we haven’t received amount even though account is linked with Aadhar